Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्यमंत्री साहेब पाया पडतो धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; पुण्यातल्या मूक मोर्चात सुरेश धस यांची मागणी

मुख्यमंत्री साहेब पाया पडतो धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; पुण्यातल्या मूक मोर्चात सुरेश धस यांची मागणी
 

धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराडला पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय हे झालं नाही असा थेट आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ते पुण्याता मुक मोर्चात बोलत होते.  दरम्यान, आपली कोटारी भरण्यासाठी दुसऱ्याच्या लेकरांना मारण्याचे संस्कार यांचे आहेत असा आरोपही धस  यांनी यावेळी केला. कारण हा वालुबाबा किंवा मोठा आका यातील कुणीही यामध्ये असो सर्वांना फाशीचीच शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही धस यांनी यावेळी केली आहे. यावेळी धस यांनी बोलताना यादीच वाचून दाखवली त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

त्यामध्ये आ एनर्जी कंपनीने निवडणुकीच्या काळात 50 लाख रुपये दिल्याचा धस यांनी दावा केला आहे. या अगोदर धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये कंपनीने 3 कोटी फायनल केले असंही धस म्हणाले आहेत. या सर्व व्यवहारात धनंजय मुंडे असल्याचा थेट आरोप धस यांनी केला आहे. त्याचबरोबर 14 जून रोजी आवादा या कंपनीसोबत धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यात बैठक झाली असंही धस यावेळी म्हणाले.

राजीनाम्याची मागणी
अजित पवार यांच्यासोबत मी काम केलं आहे. तो माणूस लहान लेकरासारख्या मनाचा आहे. परंतु, त्यांचे काय हात गुंतलेत हे मला कळत नाही. हा माणूस मंत्रिमंडळात का ठेवला आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर मी ज्या तारखा सांगितल्या आहेत त्यामध्ये जर काही चूक निघाल तर मी राजकारण सोडून देईल असंही धस यावेळी म्हणाले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.