Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एकही जीव वाचणार नाही, सगळं काही नष्ट होणार ! शास्त्रज्ञांनी सांगितली पृथ्वीच्या विनाशाची तारीख

एकही जीव वाचणार नाही, सगळं काही नष्ट होणार ! शास्त्रज्ञांनी सांगितली पृथ्वीच्या विनाशाची तारीख
 

नवी दिल्ली : एक दिवस येईल जेव्हा सर्व सजीव नष्ट होतील आणि काहीही शिल्लक राहणार नाही. याला संपूर्ण विनाशाचा दिवस म्हटलं जात आहे. हे का आणि कसं होईल यावर शास्त्रज्ञ सतत संशोधन करत आहेत. याबाबत त्यांना कॉम्प्युटर सिम्युलेशन तंत्रज्ञानाचा वापर करून धक्कादायक माहिती मिळाली आहे. ज्यात त्यांना पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होईल हे समजलं आहे. ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी कॉम्प्युटर सिम्युलेशनद्वारे संशोधन केलं. त्यांचं संशोधन 2023 मध्ये नेचर जिओसायन्समध्ये प्रकाशित झालं. त्यांनी व्हर्चुअल सिम्युलेशनद्वारे पृथ्वीचे भविष्य पाहण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये ग्लोबल वार्मिंगचा समावेश होता. यानंतर दिसलेले परिणाम भयावह होते.

 
शास्त्रज्ञांनी काय काय पाहिलं?
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीवरील मानवासह सर्व सजीव नष्ट होतील. त्यावेळी पृथ्वीचं तापमान 70 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. अशा वातावरणात पृथ्वीवर कोणताही प्राणी किंवा मनुष्य जिवंत राहू शकत नाही. उष्णतेमुळे सर्व काही नष्ट होईल. आताच्या तुलनेत 40 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड सोडलं जाईल, ज्यामुळे श्वास घेणं कठीण होईल. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोक वेदनांनी मरतील. इतर सजीवांच्या बाबतीतही असंच घडेल. एकाच वेळी मोठ्या संख्येने लोक मारले जातील.

शास्त्रज्ञ म्हणतात की, पृथ्वी प्रथम गरम होईल, नंतर कोरडी होईल आणि शेवटी निर्जन होईल. शिवाय, ज्वालामुखी जेव्हा उष्णता सहन करू शकत नाहीत तेव्हा उद्रेक होतात आणि असं म्हटलं जातं की पृथ्वीचा बहुतेक भाग ज्वालामुखींनी व्यापलेला आहे. अशा परिस्थितीत पृथ्वी तापत असताना ज्वालामुखीचा उद्रेक होऊन जीवन संपुष्टात येईल.
कधी होणार पृथ्वीचा अंत?

शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की, ज्या वेगाने आपण पृथ्वीवरील कार्बनचं प्रमाण वाढवत आहोत, त्यामुळे हे लवकर होण्याची शक्यता आहे. पुढील 250 दशलक्ष म्हणजेच 25 कोटी वर्षांनंतर पृथ्वीवर प्रलय येऊ शकतो आणि सर्व काही नष्ट होईल. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, संशोधन पथकाचे प्रमुख अलेक्झांडर फर्न्सवर्थ यांनी म्हटलं आहे की पृथ्वी कोणत्याही सजीव प्राण्याला राहण्यासाठी योग्य राहणार नाही कारण ती खूप उष्ण होईल. त्यांनी सांगितलं की सुमारे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी जगात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण आताच्या दुप्पट होतं. त्यामुळे शरीर तापल्याने लोकांचा मृत्यू होतो.

फक्त इथं राहण्यायोग्य परिस्थिती
अशीच घटना 66 दशलक्ष वर्षांपूर्वी घडली होती आणि डायनासोर नामशेष झाले होते, असं म्हटलं जातं. पृथ्वीचा इतिहास पाहता असं म्हटलं गेलं की पेन्गिया नावाचा शेवटचा खंड 330 दशलक्ष ते 170 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. आता 250 दशलक्ष वर्षांनंतर, सर्व खंड विलीन होऊन महाखंड Pangea Ultima तयार होतील. पॅन्गिया अल्टिमाच्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील भागांच्या काठावर राहण्यायोग्य परिस्थिती टिकून राहण्याची शक्यता आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.