Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापुरातील राष्ट्रवादीच्या नेत्याचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
 

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये सध्या कुंभमेळा सुरू झाला असून, कोट्यवधी भाविक या सोहळ्याला हजेरी लावत असतात. मात्र, मंगळवारी प्रयागराजमधील त्रिवेणी संगमात एक दु:खद घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) नेते महेश कोठे स्नान करत होते.

या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे त्याचा मृत्यू झाला. 60 वर्षांचे महेश कोठे हे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर राहिले आहेत. आज त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सोलापूरला आणलं जात आहे. सकाळी 7:30 च्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. महेश कोठे त्यांच्या मित्रांसोबत त्रिवेणी संगमात आंघोळ करत होते. नदीच्या पाण्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं.
सोलापूरमधून लढवली होती विधानसभा

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांनी सोलापूरमधून भाजपचे विजय देशमुख यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि एक मुलगा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

"सोलापूरने एक समर्पित कार्यकर्ता गमावला"
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील एका पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांनी कोठे कुटुंबाप्रति सहवेदना व्यक्त केल्या. "सोलापूरचे सर्वात तरुण माजी महापौर व माझे जुने सहकारी महेश कोठे यांचे प्रयागराज येथे दुःखद निधन झाले. सोलापूर शहराच्या समाजकारणात व राजकारणात महेश कोठे यांचे मोठे प्राबल्य होते. त्यांच्या रूपाने सोलापूर शहराने एक धडाडीचा कार्यकर्ता गमावला आहे. कोठे कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली"

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.