मिरज :-पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्य निर्मित बनावट मद्याचे तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क, मिरज विभागाची धडक कारवाईत एकूण ६८ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.:, अधीक्षक पोटे
मिरज :-मा.श्री.डॉ. विजय सूर्यवंशी साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई, मा.श्री. प्रसाद सुर्वे साहेब, संचालक, दक्षता व अमंलबजावणी, राज्य उत्पादन शुल्क, म.रा. मुंबई, यांचे आदेशानुसार मा. श्री. विजय चिंचाळकर साहेब, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर मा. श्री. प्रदीप पोटे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सांगली, मा.श्री. ऋषिकेश इंगळे साहेब, उप-अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सांगली, यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मिरज या कार्यालयाच्या पथका मार्फत दिनांक-२२/०१/२०२५ रोजी पहाटे ६:१५ वाजताच्या सुमारास मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वरती मिरज शहराच्या हद्दीत मिरज ता.मिरज जि-सांगली या परीसरात सापळा लावुन गोवा राज्य निर्मीत तसेच मध्य प्रदेश राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्य निर्मित राज्यात विक्रीकरीता असलेल्या विदेशी मदयाची व बिअरची अवैधरीत्या वाहतूक करणारा आयशर (EICHER) कंपनीचा सहाचाकी ट्रक जिचा क्रमांक. MH १० DT ९२९४ हे वाहन जप्त करुन कारवाई करण्यात आली. सदर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हयातील महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून आयात करीत असताना विविध ब्रेडचे विदेशी मदयाचे व बिअरचे एकूण ६५१ बॉक्स मिळुन आले. सदर मुददेमालामध्ये गोवा राज्य निर्मीत तसेच मध्य प्रदेश राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्य निर्मित विक्री करता असलेले विविध प्रकारचे विदेशी मदय व बिअर असा एकूण ३३,४१,२८०/- रुपये किंमतीचा मद्यसाठा व EICHER कंपनीची ट्रक त्याचा क्रमांक. MH १० DT ९२९४ सहाचाकी ट्रक या वाहनामध्ये मिळून आला. सदर गुन्हयामध्ये वाहनासह एकूण रुपये ६८,४९,२८०/- इतक्या किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्यामध्ये वाहनचालक आरोपी इसम नामे १) जमीर अकबर मकानदार वय-३१ वर्षे व्यवसाय ट्रक चालक रा पाडळी, पाडळीकेसे सातारा २) शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार वय वर्ष. २७ रा. बालाजीनगर विजयनगर पाडळीकेसे सातारा यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) ८०,८१,८३,९०, व १०८ अन्वये गुन्हा नोंद करुन आरोपी इसमास जागीच अटक करण्यात आलेली आहे.
सदर कारवाईत, श्री. दिपक बाळकृष्ण सुपे, निरीक्षक, रा.उ.शु, मिरज, श्री. प्रभात सावंत, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जत, श्री. अजय लोंढे, श्री.लक्ष्मण पोवार, श्री जयसिंग खुटावळे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मिरज तसेच श्री. उदय पुजारी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मिरज, श्री. इरफान शेख , सहाय्यक दुय्यम निरीक्षक जत, जवान श्री. स्वप्नील अटपाडकर, श्री. विनायक खांडेकर, श्री. पुंडलिक बिरुंगे, श्रीमती. कविता सुपने, श्रीमती. शाहीन शेख, तसेच वाहन चालक श्री. स्वप्नील कांबळे आदींनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री.दिपक बाळकृष्ण सुपे नरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सांगली हे करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.