Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साल्यांनो, एक, दोन हजारात विकले गेलात.. तुमच्यापेक्षा रांडा बऱ्या !

साल्यांनो, एक, दोन हजारात विकले गेलात.. तुमच्यापेक्षा रांडा बऱ्या !
 

बरं झालं.. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना आरसा दाखवला.. निवडणुकीच्या काळात याच गायकवाड यांसह अख्ख्या राज्यातले आमदारकीचे उमेदवार हात जोडून मतदारांना मताचा जोगवा मागत होते. त्यांना विनवण्या करत होते. त्यांना राजा म्हणत होते.. निवडणूक संपली.. लोकांनी निवडून दिले.. मग निवडणुकीत त जर पैसा वाटला असेल, आणि तरीही अजून विकास कामासाठी निवेदने घेत असतील तर चीड येणारच ना? संजय गायकवाड यांनी काय चुकीचं केलं? एकदम बरोबर केलं..!

 

आता संजय गायकवाड काय म्हणाले? वेगळे कुठे काय म्हणाले? तुम्ही मला साधं एक मत देऊ शकत नाही? फक्त दारू, मटण, पैसे? अरे दोन, दोन हजारांत विकले गेले साले. दोन हजारात? पाच हजारात? यांच्यापेक्षा तर रांडा बऱ्या! एवढेच तर ते म्हणाले. बघा ते कुठे वाईट बोलले? थोडे बहुत सगळ्या मतदारसंघात आमदार आता असे बोलू लागलेतच की! सध्या सर्वच आमदारांवर ताण आहे. त्याचा विचार करून निवडणुकीच्या काळात झालेला खर्च भरून निघेपर्यंत तरी मतदारांनी थांबायला हवं !

 
एकतर पैसे घ्यायचे.. पैसे घेतल्याशिवाय मतदानाला यायचे नाही आणि वर पुन्हा विकासकामांची मागणी करायची; मग लोकप्रतिनिधी चिडणारच ना? हळूहळू ही चीडचीड आता समोर येऊ लागली आहे. कधी नव्हे एवढा त्रास या निवडणुकीत उमेदवारांना झाला आहे हे कुठेतरी समजून घ्यायला हवं. एकतर मतदानासाठी पैसे तर घेतले गेलेच, पण निवडणुकीच्या काळात प्रचार देखील मोठ्या धामधुमीचा करावा लागला. एरव्ही बरोबर मोकार फिरणाऱ्या व साहेब तुम आगे बढोच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना देखील यावेळी पैसे भरवावे लागले.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.