महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जातात. या योजनेत दर महिन्याला महिलांच्या बँकेत थेट पैसे जमा केले जातात. या योजनेत आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. ७२ तासानंतर हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच जानेवारीचा हप्ता २६ जानेवारी रोजी जमा होणा होणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी ४ दिवस उरले आहेत. त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता आला होता. त्यानंतर आता जानेवारीतदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे मिळणार आहे. बाबत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अपडेट समोर येत होत्या. अपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातून पैसे काढून घेतले जाण्याचेही सांगण्यात येत होते. त्याचसोबत अपात्र महिलांवर कारवाई केली जाईल, असंही सांगितलं जातं होतं. मात्र, याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज माघारी घेतले आहे. अपात्र असूनही त्या या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे त्यांनी स्वतः हून अर्ज माघारी घेतले आहेत.
२१०० रुपये कधीपासून?
लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधीपासून मिळणार याबाबत महिला प्रश्न विचारत आहेत. अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता होती. मात्र, याबाबत कोणतीही शिफारस बालकल्याण विभागाकडून अर्थमंत्रालया कडे करण्यात आलेली नाही. त्यामुळे मार्च महिन्यात तरी २१०० रुपये मिळणार की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.