नागपूर : शहरातील एका महिला वकिलावर पतीकडून वारंवार अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. तसेच सासरच्या मंडळी कडून माहेरून हुंडा आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी अजनी पोलिसांनी पती व न्यायाधीश असलेला सासरा व सासू व नणंद विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही धक्कादायक घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुनील, त्याचे वडील, आई व बहीण अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ३० वर्षीय मोनालीच्या (सर्वांची नावे बदललेली) तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील हा ऑनलाइन गेम ट्रेडिंगचे काम करतो. त्याचे वडील न्यायाधीश आहेत. मोनाली ही वकील आहे. नोव्हेंबर २०२३मध्ये मोनालीचे सुनील याच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर सुनीलने पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. ‘माझे वडील न्यायाधीश आहेत. मी काहीही करू शकतो’, असे म्हणत त्याने मितालीचा छळ सुरू केला. त्यानंतर सुनीलचे वडील, आई व बहिणीनेही मोनालीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली.
रोज सकाळी ६ वाजता सुनीलची आई त्याला हॉलमध्ये बोलवायची. मोनाली हिच्या कुटुंबीयांनी तुझ्यावर काळी जादू केली आहे., असे म्हणायची. याचदरम्यान एप्रिल महिन्यात दर मंगळवारी रात्री सुनील व त्याचे नातेवाईक घरात अघोरी प्रकारची विचित्र पूजा आणि मंत्राचा जप करायचे, असे मोनालीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जानेवारी २०२४मध्ये सुनीलने पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे तिची प्रकृती खालावली. या घटनेनंतर तो नेहमीच मोनाली वर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लागला.
न्यायालयात जाण्यास बंदी घातली
जानेवारीला मिताली न्यायालयातील काम आटोपून घरी परतली. पत्नीला न्यायालयात जाण्यास बंदी घातली. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी त्याच्या बहिणीने शिवीगाळ करीत टोमणे मारले. १० जानेवारीला सासूने मारहाण करून माहेराहून ५० लाख रुपये हुंडा आणण्यास सांगितले.
‘रात्री दार उघडे ठेऊन झोपा, कॅमेरेही सुरू ठेवा’
जून महिन्यात मितालीच्य सासऱ्यानेही तिला शिवीगाळ करीत ‘रात्री दार उघडे ठेऊन झोपत जा, कॅमेरेही सुरू ठेवत जा, अन्यथा वाईट परिणाम होतील’, अशी धमकी दिली. १ ऑगस्टला सायंकाळी मोनाली ही स्वयंपाकघरात होती. यावेळी तिचा सासरा तेथे आला. सासऱ्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. पती आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेला छळ वाढत असल्याने मोनालीने अखेर अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.