अभिषेक बाळाप्पा बेवनूर (यलपारट्टी, ता. रायबाग), आदिलशहा ऊर्फ अप्पू शब्बीर जमादार (हारूगेरी, ता. रायबाग) व कौतुक ऊर्फ बाबसू बानू बडिगेर (अलकनूर, ता. रायबाग) अशी संशयितांची नावे आहेत. डॉ. गुळेद यांनी सांगितले, सोशल मीडियावरील मेसेजला प्रतिसाद देत एक अल्पवयीन मुलगीची अभिषेक याच्याशी ओळख झाली. कोकटनूर यात्रेत ते भेटले. अभिषेकने सौंदत्ती यल्लम्माला जाऊन परत येऊया, अशी गळ घातली. अभिषेक याने आदिलशहा जमादार याला सोबत घेतले. या दोघांनी एक मोटार घेतली. त्यात चालक म्हणून कौतुक होता. मुलीवर अभिषेकने व आदिलशहाने अत्याचार केले.
या अत्याचाराचे व्हिडिओ शूटिंग करून घेतले. मुलींनी हारूगेरी पोलिसांत जाऊन १३ रोजी फिर्याद दिली. श्रृती, आर. बी. बसरगी, अथणीचे पोलिस उपाधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलिस निरीक्षक बी. एस. मंटूर, माळाप्पा पुजारी, बी. एस. होसट्टी, रमेश मुंद्दीनमनी, ए. एस. शांडगे, एच. आर. आंबी, पी. एस. सप्तसागर, एस. ए. हुगार, विनोद ठक्कनावर यांनी ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.