सैफ चाळीत राहत असता तर...
सैफ वांद्र्याच्या उच्चभ्रू सोसायटीत राहत होता. जिकडच्या श्रीमंत लोकांना कुणाची काही पडलेली नसते. मध्यरात्री सैफच्या घरी चोर आला. त्याच्यावर हल्ला झाला. एवढा हंगामा झाला. एक तास चोर बिल्डिंगमध्ये होता. ना शेजारी मदतीला आले, ना सिक्युरिटी आला. जवळच शाहरूख, सलमान, राहतात. कुणी आले नाही. (शाहिद कपूरने तरी यायला हवे होते). बिचारा सैफचा बारका पोरगा रिक्षा घेऊन आला. करीना स्वतः पोरांना घेऊन घरात बसली. सर्व काही सामसुम. जणू काही झालेच नाही. सर्व सोपस्कार सैफच्या कुटुंबियांना एकट्याने करावे लागले.
पण जर सैफ चाळीत राहत असता तर...
रात्री जरा जरी वह आवाज झाला असता तर संपूर्ण चाळ जागी झाली असती. बंड्या पटकन रिक्षा घेऊन आला असता. पद्या, अन्या, राजू, चंदू पटापट धावत आले असते. सावंत काका लुंगी सावरत रिक्षातून सोबत गेले असते. पोरांच्या १०- १२ बाईक निघाल्या असत्या. पाटील काकूंनी बळेबळे करीना वहिनीच्या हातात पटकन ५ हजार ठेवले असते. राऊतं काकूंनी सैफच्या पोरांना आपल्या घरात नेऊन खायला दिले असते.
चाळीतील पोरं रात्रभर लीलावतीच्या खाली (सिगारेट फुंकत, कटिंग मारत) बसली असती. अख्खी चाळ खाली जमा होऊन रात्रभर सर्व जागे राहिले असते. दोन चार पोरं चोराच्या मागे जाऊन त्याच्या मुसक्या आवळत चोप देत आणले असते. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी सर्वसामान्य लोक जपतात. धनदांडग्याच्या नशिबी एकटेपणाच जास्त.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.