Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिर्डीच्या साई मंदिरातील मोफत जेवण बंद करा, महाराष्ट्रातील सगळे भिकारी तिथे गोळा होतात", सुजय विखेंची मागणी!

शिर्डीच्या साई मंदिरातील मोफत जेवण बंद करा, महाराष्ट्रातील सगळे भिकारी तिथे गोळा होतात", सुजय विखेंची मागणी!
 

साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी साई संस्थान प्रशासनाकडे मागणी केली आहे. तसेच जे पैसे या अन्नदानातून गोळा होतील, त्या पैशांचा वापर मुला-मुलींच्या शिक्षणासाठी करावा, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता विविध चर्चांना उधाण आलं आहे. अहिल्यानगरमध्ये शिर्डी परिक्रमा उद्घोषणा कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील यांनी यासंदर्भातील मागणी केली आहे. तसेच त्यांनी साई संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील शिक्षकांवरही ताशेरे ओढले.

 

काय म्हणाले सुजय विखे पाटील?

"शिर्डीत कोट्यवधी रुपये खर्च करून शैक्षणिक संकुल उभारण्यात आलं आहे. मात्र तिथे चांगले शिक्षक नाही. इंग्रजी शिकवणाऱ्यालाच इंग्रजी येत नाही. इंग्रजीचा शिक्षक मराठीत इंग्रजी शिकवतो आहे. याचा काय उपयोग?" असा प्रश्न सुजय विखे पाटील यांनी विचारला.

 

"शिर्डीतील मोफत जेवण बंद करा"

पुढे बोलताना सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील मोफत जेवण बंद करण्याचीही मागणी केली. "आज अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवण करतो आहे. महाराष्ट्रातील सगळे भिकारी इथे गोळा होतात. हे योग्य नाही. साई संस्थानने सर्वात आधी शिर्डीतले मोफत जेवण बंद करावे, यासाठी शुल्क आकारण्यात यावे. यातून जे पैसे गोळा होतील, त्याचा वापर मुलींच्या शिक्षणासाठी करावा", असे ते म्हणाले.

"शिर्डीत येणारा जेवणासाठी १० रुपये खर्च शकतो"

शिर्डीची संस्था चांगलं काम करते आहे. मात्र, आता काही महत्त्वाचे निर्णय घेणं आवश्यक आहे. या संस्थेच्या पैशांचा वापर मुलाचं भविष्य घडवण्यासाठी व्हायला हवा. या पैशातून मुलांसाठी स्टेडियम उभारण्यात यावं. संस्था ज्या शाळा चालवतात, त्याचा शैक्षणिक दर्जा उंजावण्यात यावा. शिर्डीत येणारा कुणीही गरीब नाही. जेवणासाठी १० रुपये कुणीही खर्च करू शकतो. त्यामुळे प्रसादायलायतील मोफत जेवण बंद करून त्यात पैशात विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, हीच आमची मागणी आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.