राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यानं केला महिलेवर बलात्कार, अंघोळीचे व्हिडिओ रेकॉर्डकरुन दोन मुलींसोबत..
मुंबईतील मालाड पुर्वेकडील कुरार परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांन शेजारी राहत असलेल्या महिलेचे अंघोळीचे व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर तीन महिन्यांपासून बलात्कार केला आहे.
मुलींचाही विनयभंग
या संदर्भात पीडित महिलेनं कुरार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. एवढचं नाही तर त्या कार्यकर्त्यांनं त्या पीडितेच्या मुलींचाही विनयभंग केला आहे. याप्रकरणी त्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छुपा स्पाय कॅमेरा बसवून
अविनाश शिंदे असं आरोपीचं नाव आहे. मुंबईच्या कुरार परिसरात पीडित महिला आपल्या 14 आणि 11 वर्षीय दोन मुलींसह राहते. आरोपीनं महिलेच्या घरात छुपा स्पाय कॅमेरा बसवून महिलेचे घरातील आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले.
मागील तीन महिन्यांपासून बलात्कार
ते त्या पीडित महिलेला दाखवून आरोपीनं पीडित महिलेवर मागील तीन महिन्यांपासून बलात्कार केला. तसंच पीडितेच्या मुलींचाही विनयभंग केला.
महिलेवर तीन महिने बलात्कार
शारीरिक संबंध ठेवू न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत होता. यातून त्यानं महिलेवर तीन महिने बलात्कार केला. तसंच, महिलेनं विरोध केलावर मुलींना गायब करण्याची देखील धमकी आरोपी देत होता, असं पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.
गुन्हा दाखल
आरोपीच्या जाचाला कंटाळून पीडितेनं कुरार पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी अविनाश शिंदे वीरोधात बलात्कार आणि विनयभंगाच्या कलमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महिला आयोगानं घेतली दखल
या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. मुंबईच्या मालाड पूर्वकडील कुरार परिसरामध्ये घडलेली घटना अतिशय संतापजनक अशी आहे. राज्य महिला आयोगाने संबंधित घटनेची दखल घेतली असून पुढील कारवाई करण्याचा तातडीने सुचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.