Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लेट लतीफ आलेल्या कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी गेटवरच रोखले

लेट लतीफ आलेल्या कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी गेटवरच रोखले
 

वाशी : वाशी तहसील कार्यालयातील उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार प्रकाश म्हेत्रे यांनी कार्यालयाबाहेर उभे करत चांगलेच फैलावर घेतले. ही घटना बुधवारी (दि.१६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.


यामध्ये दोन नायब तहसिलदार, दोन पेशकर, कर्मचारी, व शिपाई यांचा समावेश आहे. यावेळी तहसीलदारांनी उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना समज देऊन यापुढे उशिराने आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.  मुख्यमंत्र्यांनी ७ कलमी कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. सदर सात कलमी कार्यक्रमअंतर्गत राज्यातील प्रशासनास येत्या १०० दिवसात प्राधान्याने करावायाच्या कार्यवाही बाबत सुचना दिल्या आहेत. याबाबत दि.१५ एपिल २०२५ रोजी मुख्यमंत्री आढावा घेणार आहेत. १०० दिवसाचे नियोजन करून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने तहसिलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी गांभीर्य लक्षात घेवून काम करावे, अशी सुचना तहसिलदार प्रकाश म्हेत्रे यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.