Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; अनेकांना उडवलं

जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; अनेकांना उडवलं


जळगावच्या परांडा रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या.

मात्र समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना उडवलं आहे. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या भीषण अपघाताने जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पुष्पक एक्सप्रेसच्या गाडीच्या चाकातून ब्रेक दाबल्यामुळे चाकातून धुर आल्याने आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्याची घटना जळगाव येथे घडली आहे. या अपघातात अनेक प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. जळगावातील पाचोरा येथे हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे. या दुर्घटनेत सात आठ प्रवासी ठार झाल्याचे म्हटले जात आहे.


आग लागल्याचे कान पडताच उड्या मारल्या

आग लागली असं मेमकं कोण म्हणालं हे नेमकं सांगता येत नाही. मात्र आग लागल्याचे कानी पडताच प्रवाशांनी रेल्वेतून खाली उड्या मारल्या, असंही या प्रवाशाने सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांनी काय सांगितले?

या घटनेनंतर एबीपी माझाने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बातचित केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत सहा ते आठ प्रवासी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडली गेली आहेत. तसेच दुर्घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय मदत पाठवली आहे. तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालये सज्ज ठेवण्यात आल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता?

सध्यातरी या दुर्घटनेत नेमके किती प्रवासी समोरून येणाऱ्या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. मात्र सध्या वैद्यकीय मदत, रेल्वे पोलीस, जळगाव जिल्ह्याचे पोलीस दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचली आहेत. जखमींवर रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. दरम्यान, या दुर्घटनेची जलगाव जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी दखल घेतली असून योग्य ती मदत आणि कार्यवाही करण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.