सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती; जाणून घ्या अटी काय असणार?
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. रेल्वे विभागात मोठी भरती निघाली आहे. आरआरबी ग्रुप डी च्या ३२ हजार भरतीसाठी सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
एकूण ३२४३८ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २३ जानेवारी २०२५ ते २२ फेब्रुवारी २०२५ पर्यंत चालेल. अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे.
अर्ज फॉर्ममधील दुरुस्त्या २५ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२५ पर्यंत करता येतील. निवडलेल्या उमेदवारांना १८०००/- रुपये (लेवल-१) वेतनश्रेणी मिळेल. या भरतीपूर्वी, २०१९ मध्ये, रेल्वे ग्रुप डी च्या १.०३ लाख पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली होती, यासाठी १ कोटी १५ लाख लोकांनी अर्ज केले होते.
गट ड च्या कोणत्या पदांसाठी भरती?
सहाय्यक (एस अँड टी), सहाय्यक (वर्कशॉप), असिस्टंट ब्रिज, सहाय्यक कॅरेज आणि वॅगन, सहाय्यक लोको शेड (डिझेल), सहाय्यक लोको शेड (इलेक्ट्रिकल), सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल), सहाय्यक पी.वे, सहाय्यक टीएल अँड एसी (वर्कशॉप), सहाय्यक टीएल अँड एसी, असिस्टंट ट्रॅक, मशीन, असिस्टंट टीआरडी, पॉइंट्समन बी ट्रॅकमेंटेनर-IV.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी दहावी उत्तीर्ण (किंवा आयटीआय) उमेदवार अर्ज करू शकतात.
३. वयोमर्यादाया भरतीसाठी १८ ते ३६ वयोगटातील लोक अर्ज करू शकतात. ओबीसी प्रवर्गासाठी वयात ३ वर्षे आणि एससी, एसटी प्रवर्गासाठी ५ वर्षे सूट देण्यात आली आहे. या पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. वयाची गणना १ जानेवारी २०२५ पासून केली जाईल.
सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या श्रेणीतील अर्जदारांचा जन्म ०१.०१.२००७ नंतर आणि ०२.०१.१९८९ पूर्वीचा नसावा.
ओबीसी (एनसीएल) श्रेणीतील अर्जदारांचा जन्म ०१.०१.२००७ नंतर आणि ०२.०१.१९८६ पूर्वीचा नसावा.
अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गातील अर्जदारांचा जन्म ०१.०१.२००७ नंतर आणि ०२.०१.१९८४ पूर्वीचा नसावा.
गेल्या काही महिन्यांत आलेल्या विविध रेल्वे भरतींप्रमाणे, ग्रुप डी भरतीच्या सूचनेमध्ये कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे. कोविड महामारीमुळे, गट ड भरतीसाठी कमाल वयोमर्यादा तीन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. कमाल वयोमर्यादा ३३ ऐवजी ३६ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही सूट फक्त एकदाच आहे असेही सांगण्यात आले आहे.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड संगणक आधारित चाचणी (CBT) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) च्या आधारे केली जाईल. सीबीटीमध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना पीईटीसाठी बोलावले जाईल. सीबीटी फक्त एकाच टप्प्यात घेतली जाईल. पीईटी नंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.