Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अशाप्रकारे अंडी खाल्ल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक!

अशाप्रकारे अंडी खाल्ल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक! 


अंडी हे उच्च दर्जाचे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला पदार्थ आहे. त्याच्या सेवनाने अनेक आरोग्य फायदे मिळतात. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए, डी, ई, बी12, रिबोफ्लेविन, फोलेट, लोह आणि सेलेनियम सारखी विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात.  असे असले तरी, आपल्यापैकी बरेच जण चुकीच्या पद्धतीने अंडी खातात, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना याची जाणीव देखील नाही. अशा परिस्थितीत, अंडी खाताना काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

चुकीच्या पद्धतीने अंडी खाल्ल्याने उद्भवतात हृदयाच्या समस्या
 
अंडी खाण्याची चुकीची पद्धत हृदयरोग होण्याची शक्यता वाढवू शकते, विशेषत: अंडी खाण्याच्या योग्य प्रमाणाच्या किंवा पद्धतीच्या संदर्भात काही गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत. अंड्यात अनेक पोषक तत्वं असतात, जसे की प्रोटीन, विटामिन D, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स, जे हृदयासाठी फायदेशीर आहे. मात्र, जर अंड्याचा वापर काही चुकीच्या पद्धतीने किंवा अधिक प्रमाणात केला गेला, तर ते हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.

अंडी खाण्याच्या चुकीच्या पद्धती:

अंडी खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकते. त्यामुळे अंडी बनवताना तसेच खाताना या सामान्य चुका करणे टाळा

अंड्याचे पांढरे आणि पिवळे भाग एकत्र करून अधिक तूप किंवा तेलात तळणे:
अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये जास्त प्रमाणात संतृप्त फॅटी अॅसिड्स आणि कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे ते जर तेलात तळले गेले, किंवा त्यात अधिक तेल किंवा तूप घालले गेले, तर कोलेस्ट्रॉलचा स्तर आणखीन वाढू शकतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका उद्भवू शकतो.

जास्तप्रमाणात अंडी खाणे:
 
काही लोकं दररोज अंडी खातात, विशेषत: अंड्यातील पिवळा बलक जास्तप्रमाणात दररोज खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. सामान्यतः दररोज अंडे खाणे हानीकारक नसळे, तरी त्याच्या अत्यधिक सेवनामुळे रक्तातील LDL (खराब कोलेस्ट्रॉल) वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

कच्चे अंडे खाणे:
अंडी पूर्णपणे शिजवल्यानंतरच खा. थोडेसे कमी शिजलेले अंडे खाणे देखील हानिकारक ठरू शकते.काही लोकं कच्च्या अंड्यांचे पाणी असेच पितात. खरंतर, कच्च्या अंड्यांची रचना अशी असते की त्यामध्ये असलेले प्रथिने एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना पचवणे सोपे नाही. अंडी शिजवल्यानंतर, प्रथिने एकत्र मिसळतात आणि ते पचनसंस्थेसाठी देखील ते चांगले असतात.
अंडी जास्तप्रमाणात शिजवणे:
 
शिजवलेले अंडे खाणे फायदेशीर आहे. पण ते जास्त तापमानावर शिजवल्याने त्यातील पोषक घटक नाहीसे होतात.अशा परिस्थितीत, अंडी नेहमी मध्यम आचेवर शिजवावीत. असे केल्याने अंडी व्यवस्थित शिजेल आणि त्यात पोषक तत्वेही राहतील. याशिवाय, अंड्यातील पिवळ्या भागामध्ये कोलेस्टेरॉल आढळते. उच्च तापमानावर शिजवल्याने हे कोलेस्टेरॉल ऑक्सिटॉलमध्ये रूपांतरित होते. अशा परिस्थितीत, हे ऑक्सिटॉल हृदयरोगांचा धोका निर्माण करू शकते.

Disclaimer: वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहे, हा कोणत्याही वैद्यकीय मताचा पर्याय नाही, त्यामुळे आहारात कोणताही बदल करताना डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.