मिरज :-शिक्षणअधिकाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्यास अटक:,महात्मा गांधी चौक पोलीसांची कारवाई
मिरज : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर मिरजेजवळ दाम्पत्यास चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या चोरट्यास गांधी चौक पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४० हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे. सुमित शत्रुघ्न काळे (वय १९, रा. माजी सैनिक वसाहत पारधी वस्ती, मिरज) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणातील आणखी दोन संशयित पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.
रत्नागिरी - नागपूर महामार्गावर मिरजेजवळ कृष्णाघाट येथे दि. २२ डिसेंबररोजी पहाटे सेवा रस्त्यावर थांबलेल्या मोटारीचा दरवाजा उघडून तिघा चोरट्यांनी शिक्षण अधिकारी नारायण माळी व त्यांची पत्नी या दांपत्यास चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती. सुमित काळे हा चोरीतील माल विक्रीसाठी पंढरपूर रस्त्यावर आल्याची नशेमन हॉटेलजवळ पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी काळे यासताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेले एक घड्याळ, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची अंगठी व गुन्ह्यात वापरलेला चाकू असा ३९,२०० रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.
मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण गिलडा, महात्मा गांधी पोलीस चौकचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या
मार्गदर्शनाने उपनिरीक्षक संदीप गुरव, धनंजय चव्हाण,सुरज पाटील, जावेद शेख,विनोद चव्हाण,अभिजित धनगर,बसवराज कुंदगोळ,मोहसीन टिनमेकर यांच्या पथकाने कारवाई केली
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.