Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एसआयटीने कोर्टात वाल्मिक कराडला उघडा पाडला, सगळे पुरावे बाहेर काढले, हत्येच्या दिवशीही सरपंचांना धमकी दिल्याचे उघड

एसआयटीने कोर्टात वाल्मिक कराडला उघडा पाडला, सगळे पुरावे बाहेर काढले, हत्येच्या दिवशीही सरपंचांना धमकी दिल्याचे उघड
 

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मकोका लागलेल्या वाल्मिक कराड याला बुधवारी बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडच्या 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी अनिल गुजर यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम मांडला.

9 डिसेंबरला केज तालुक्यात संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. 3 ते 3.15 दरम्यान संतोष देशमुख यांचे अपहरण झाले होते. त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले होते, अशी माहिती एसआयटी अधिकारी अनिल गुजर यांनी कोर्टाला दिली. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि या तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ मिळतीजुळती असल्याचेही अनिल गुजर यांनी सांगितले. सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये 9 डिसेंबरला काय तपास झाला, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे वाल्मिक कराड याची 10 दिवसांसाठी पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी एसआयटीने केली आहे. यावर आता न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

एसआयटीकडून वाल्मिक कराड याच्यावरील गुन्ह्यांची यादी न्यायालयात सादर
वाल्मिक कराडवर यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांची लिस्ट कोर्टात सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आली. इतर आरोपींविरोधातही दाखल गुन्ह्यांची माहिती दिली. MCOCA कसा लावण्यात आला याचा संदर्भ एसआयटीकडून देण्यात आला. इतर आरोपीविरोधही दाखल गुन्ह्यांची माहिती एसआयटीने न्यायालयात दिली. वाल्मिक कराडने हत्येच्या दिवशीही संतोष देशमुखांना धमकी दिल्याचा धक्कादायक दावा देखील एसआयटीने केला आहे. वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी एसआयटीने 9 ते 10 ग्राउंडस मांडली. दरम्यान कोर्टातला युक्तिवाद हा ऑन कॅमेरा सुरु आहे. कोर्टरूममध्ये केवळ दोन्ही पक्षाचे वकील, आरोपी, तपासअधिकारी हेच उपस्थित आहेत.
न्यायालयात SIT तर्फे तपासअधिकारी अनिल गुजर यांनी तपासाची कोणती माहिती दिली?

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाली. त्यादिवशी दुपारी 3.20 ते 3.30 दरम्यान दहा मिनिटात सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचे फोनवरून संभाषण झाले, अशी एसआयटीने बीड जिल्हा न्यायालयात सुनावणीदरम्यान माहिती दिली. तसेच वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात त्या दिवशी नेमकं काय बोलणं झाला याचा तपास करायचा आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि य तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ मिळतीजुळती आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या दहा दिवसाच्या कोठडीची मागणी एसआयटीकडून करण्यात आली.

आरोपीचे वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कोणता युक्तिवाद केला?
कुठल्याही आरोपीने वाल्मिक कराडचे नाव घेतले नाही.वाल्मिक कराड विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही. वाल्मिक कराड वर हत्येचा गुन्हा लागू होऊ शकत नाही. वाल्मिक कराड यांची अटक बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद वाल्मिक कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.