पूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा आणि वादाचा रागातून विटा जवळील कार्वे येथे एका हॉटेल व्यावसायिकाचा निघृणपणे खून करण्यात आला. मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी विटा पोलिसांनी तीन संशयिताना ताब्यात घेतले आहे.
भांडणाचा राग मनात धरुन तलवारीने, गुप्तीने, हॉकी स्टीकने खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. राहुल जाधव (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माणिक संभाजी परीट व गजानान गोपीनाथ शिंदे (मंगरुळ ता. खानापूर), अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, नितीन पांडुरंग जाधव (सर्व, कार्वे ता. खानापूर) अशी संशयितांची नावे आहेत. माणिक परीट, गजानन शिंदे व नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे विटा पोलिसांनी सांगितले आहे. खून प्रकरणी आतापर्यंत 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मृताचा भाऊ राजाराम जाधव (कार्वे) यांनी या खून प्रकरणी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास कार्वे येथील पुलावर राहुल जाधव यांची ही कार अडवून भररस्त्यातच गुप्ती व तलवारीने डोक्यात वार करून, तसेच हॉकी स्टीकने मारहाण करून खून केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.