'सरपंच संतोष देशमुखांचा खून आरोपींनी एन्जॉय केला', पोलिसांची न्यायालयात धक्कादायक माहिती, नेमकं काय घडलं?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना काल (शनिवारी) पुण्यातून बीड पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतलं.
9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या झाली होती. हत्या झालेल्या दिवसापासून आरोपी 26 दिवस हे पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर त्यांना पकडण्यात काल पोलिसांना यश आले आहे. तर संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे याला कल्याण मुंबईतून अटक करण्यात आली. त्या तिघांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तीनही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात माहिती देताना सरपंच संतोष देशमुख यांचा आरोपींनी केवळ खूनच केला नाही, तर खून करताना तो एन्जॉयही केला, अशी धक्कादायक माहिती दिली आहे.
खून एन्जॉय केल्याची न्यायालयात दिली माहिती
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा आरोपींनी केवळ खूनच केला नाही, तर खून करताना तो एन्जॉयही केला, अशी धक्कादायक माहिती शनिवारी पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. देशमुख खून प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केलं. यावेळी पोलिस कोठडीची मागणी करताना पोलिसांनी न्यायालयाला आरोपींनी केलेल्या निर्घृण खुनाची माहिती दिली. तसेच या माथेफिरूंनी त्यांचा खून एन्जॉय केला, असेही सांगितले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या प्रमुख आरोपींपैकी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे हे फरार होते. यातील सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना बीड पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर गेले 26 दिवस ते फरार झाले होते. त्यांच्या मागावर बीड पोलिसांचे पथक होते. पंरतु आरोपी मोकाट असल्याने मोर्चे, आंदोलने आणि नेत्यांचा पोलिसांवरील दबाव वाढतच होता. दरम्यान, रात्री एका डॉक्टरची तीन ते चार तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं.
संतोष देशमुखांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे गजाआड
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी होते. आता त्यामध्ये आणखी एकाची वाढ झाली आहे. हत्या झाली त्या 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हे कुठे आहेत? कुठे जाणार आहेत? याबाबतचे सर्व लोकेशन सिद्धार्थ सोनवणे हा सुदर्शन घुले याच्यास इतर आरोपींना देत होता, असे तपासामध्ये समोर आले होते. त्यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी तो कल्याण येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांच्याबरोबरच त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यालादेखील 18 जानेवारीपर्यंत म्हणजेच 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.