आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणं खूपच सामान्य झालं आहे. मात्र, या सवयीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं अनेक संशोधनांद्वारे सिद्ध झालं आहे.
प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणं तात्पुरते सोयीचं वाटत असलं, तरी दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या निर्माण करू शकतं. प्लास्टिकच्या बाटल्यांचे दुष्परिणाम प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बीपीए (Bisphenol A) आणि इतर घातक रसायने असतात, जी पाण्यात मिसळतात. ही रसायने शरीरातील हॉर्मोन्सचा समतोल बिघडवतात आणि कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देतात. याशिवाय, प्लास्टिकमधील सूक्ष्म कण (मायक्रोप्लास्टिक) पचन संस्थेमध्ये साचतात, ज्यामुळे इतर आरोग्य समस्या निर्माण होतात.
उष्णतेच्या संपर्कात प्लास्टिक बाटल्या आल्यास, त्यातून डायॉक्सिन सारखी रसायने पाण्यात मिसळतात. त्यामुळे उन्हात किंवा उष्ण ठिकाणी ठेवलेल्या बाटल्यांमधील पाणी पिणं अधिक धोकादायक ठरतं. पर्यावरणीय संकट फक्त आरोग्याचाच नाही, तर प्लास्टिकच्या बाटल्यांचा पर्यावरणावरही वाईट परिणाम होतो. प्लास्टिक विघटनासाठी शेकडो वर्षे लागतात. त्यामुळे पर्यावरण दूषित होत असून जल आणि जमिनीच्या आरोग्यावरही परिणाम होतो.सुरक्षित पर्याय आणि उपाय तज्ञांच्या मते, प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टील, तांब्याच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरणं अधिक सुरक्षित आहे. या पर्यायांमुळे केवळ आरोग्यच नाही, तर पर्यावरणाचंही रक्षण करता येईल. तसेच, प्लास्टिक बाटल्या पुन्हा वापरत असाल, तर त्या स्वच्छ धुणे आणि उष्णतेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. सारांश आरोग्यसाठी आणि पर्यावरणासाठी प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर शक्यतो टाळावा, अशी सूचना आरोग्य तज्ज्ञांकडून केली जात आहे. प्लास्टिकविरोधी चळवळीला गती देण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.