पण पौष्टिक पदार्थ त्याच्या गुणधर्मांसाठी खायचे ठरतवतो जसे की भाज्या, फळे, सुकामेवा, दूध आपण निश्चिंत होऊन आहारात घेतो. दुधाचे पदार्थ आणि ताजे दूध शरीरासाठी फार उपयुक्त असते.
लहान मुलांनाही बळजबरी करुन दूध दिले जाते. मात्र कशावरून तुम्ही वापरत असलेले दूध शुद्ध आहे? आजकाल पदार्थांतील भेसळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दुधातही सर्रास भेसळ केली जाते. पण भेसळ असलेले दूध आरोग्यासाठी धोक्याचे. धात पाणी घालून त्याची पातळी वाढवतात. पण पाण्यामुळे रंगात आणि फेसात फरक नको जाणवायला म्हणून विविध रसायने मिसळली जातात. दुधात स्टार्च, रंग, डिटर्जंट , गोड रसायने, फॉर्मलिन, युरिया सारखे पदार्थ घालतात.
कशी ओळखायची दुधातली भेसळ?
१. जे दूध वापरणार आहात त्यातील थोडेसे दूध घ्या. ते उकळून गार करा. आता त्यात २-३ थेंब आयोडीन घाला. जर दुधात स्टार्च नसेल तर रंग बदलणार नाही किंवा थोडासा पिवळा होईल. पण जर स्टार्च असेल तर रंग निळा होतो.२. थोडेसे दूध घ्या. त्यात जेवढे दूध घेतले तेवढेच पाणी घ्या. आणि ते जोरात ढवळा. जर पाण्यात डिटर्जंट घातले असेल तर त्याला फेस येईल. फेस आला नाही म्हणजे त्यात डिटर्जंट नाही.३. थोडं दूध घेऊन त्यात सोयाबिन टाका. व्यवस्थित ढवळा. त्यात लाल लिटमस पेपर बुडवा. जर रंग लालच राहिला, तर घाबरायचे कारण नाही. पण पेपर निळा झाला तर त्यात युरिया मिसळले आहे असे समजावे.४. थोड्याशा दुधात सल्फ्युरीक ॲसिड घाला. आणि न ढवळता तपासा. जर रंग निळा झाला तर दुधात फॉर्मलिन आहे.५. थोडासा उतार असलेल्या स्वच्छ जागेवर एक थेंब दूध ठेवा. जर तो थेंब अगदी हळू सरकला आणि डाग मागे राहिला तर दुधात पाणी नाही. पण जर लगेच सरकला तर पाणी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.