Big Breaking:- छत्तीसगडमध्ये नक्षल्यांचा भ्याड हल्ला, ८ जवान शहीद, चालकही मृत्यूमुखी
छत्तीसगडमधील बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर सोमवारी (दि.६) दुपारी भ्याड हल्ला केला. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले.
नक्षलवाद्यांनी कुत्रू रोडवर आयईडी पेरला होता, सुरक्षा दलाचे वाहन त्याच्या प्रभावाखाली आले आणि स्फोट झाला. या IED स्फोटात भारतीय लष्कराचे ९ जवान शहीद झाले आहेत. तर ६ हून अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती बस्तरच्या पोलिस अधिक्षकांनी दिल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.
सोमवारी (दि.६) दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरचे संयुक्त ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना विजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे रस्त्यावर नक्षलवाद्यांनी हा घातपात केला. नक्षलवाद्यांनी कुत्रू पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी आयईडीचा स्फोट करून सुरक्षा दलाचे वाहन उडवले. यामध्ये ८ दंतेवाडा डीआरजी जवान आणि एक ड्रायव्हर यांचा मृतांमध्ये समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.