मुंबई हायकोर्टात क्लर्क पदासाठी भरती; पगार 90 हजार रुपये, तात्काळ करा अर्ज
सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या तरुण-तरुणींच्या कामाची बातमी आहे. काऱण, मुंबई हाय कोर्टात रिक्त पदांवर भरती प्रक्रिया होत आहे. ही भरती प्रक्रिया क्लर्क पदांसाठी होत आहे.
या भरती प्रक्रियेच्या अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज भरण्याची सुरुवात 22 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे.
बॉम्बे हायकोर्टात एकूण 129 क्लर्क पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. अर्ज भरण्यास 22 जानेवारीपासून सुरुवात झाली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे. मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क होण्यासाठी इच्छुक उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. यामध्ये कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
शैक्षणिक पात्रतेच्या व्यतिरिक्त इच्छुक उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेचे (GCC-TBC) किंवा आयटीआयकडून मिळालेले इंग्रजी टापयिंग 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी Bombay High Court Recruitment 2025 Official Notification Download PDF या लिंकवर क्लिक करा.
अर्ज कुठे आणि कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवाराने अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम हायकोर्टाची अधिकृत वेबसाईट https://bombayhighcourt.nic.in ला भेट द्यावी.
यानंतर वेबसाईटवरील न्यूज अँड इव्हेंट्स सेक्शनवर क्लिक करा.
यानंतर Applications are invited for the post of "Clerk" या लिंकवर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जाहिरात, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना, Apply Online हे पर्याय दिसतील.
वयोमर्यादा किती?
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष असावे. तर कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आहे. तर एससी, एसटी, ओबीसी, एसबीसी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्दाता 43 आहे. तसेच हायकोर्ट किंवा सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट नाहीये.
पगार किती मिळणार?
या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना 29,200 - 92,300 रुपये प्रति महिना इतका पगार मिळणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.