नेपाळ 7.1 रिश्टर स्केल भूकंपाने हादरलं, उत्तर भारतातही जाणवले धक्के
नेपाळच्या सीमेवर तिबेटजवळ आज पहाटे भूकंपाचे मोठे धक्के बसले. पहाटे ६ वाजून ३५ मिनिटांनी ७ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ हादरलं. या भूकंपाचे हादरे उत्तर भारतातही जाणवले.
बिहार, आसाम, उत्तर प्रदेशातील काही भागात सौम्य धक्के बसले. भूकंपाचे केंद्र नेपाळपासून ८४ किमी अंतरावर लोबुचे इथं होतं.
आसामपासून बिहार, उत्तर प्रदेश, दिल्लीसह उत्तर भारतातल्या अनेक राज्यात भूकंपाचे हादरे बसले. दिल्ली एनसीआर, मध्य प्रदेश, बिहारच्या पटना, मुजफ्फरपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळ पहाटे १ वाजता हादरलं, तर उत्तर भारतात मंगळवारी पहाटे साडे सहाच्या सुमारास भूकंप झाला.
दिल्ली, नोएडा, गाझियाबादसह एनसीआरमधील लोकांमध्ये भूकंपामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. पहाटेच्या सुमारास झालेल्या भूकंपामुळे लोकांची झोप उडाली. घाबरूल लोक घराबाहेर आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
नेपाळमधील भूकंपाची तीव्रता इतकी होती की त्याचे धक्के उत्तर भारतातील काही भागात जाणवले. पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली हरियणासह इथर राज्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. स्थानिक माध्यमांनी सांगितले की, नेपाळमध्ये भूकंपामुळे इमारतींचं नुकसान झालंय. पण जिवीतहानी झाल्याची माहिती अद्याप नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.