नवी मुंबई :- 7 वर्षात पैसे तीनपट...नवी मुंबईत 500 कोटीचा घोटाळा, तब्बल तीन लाख लोकांची फसवणूक
नवी मुंबई : गुंतवणूक करा, व्याजासह मोठ्या रकमेचा फायदा मिळवा, असे आमिष दाखवून एका व्यक्तीने मुंबई आणि उपनगरातील तीन लाख लोकांना 500 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. या व्यक्तीने लोकांना पाच वर्षात दुप्पट, सात वर्षात तीनपट आणि 10 वर्षांमध्ये चौपट रक्कम देण्याचे आमिष दाखवले.
त्याच्या या आमिषाला बळी पडत तीन लाख लोकांची फसवणूक झाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पोलिसांना या चिटफंड घोटाळ्याची माहिती मिळेपर्यंत त्याने तीन लाख लोकांना अंदाजे 500 कोटी रुपयांना लुबाडले आहे. हा चिटफंड घोटाळा माफको मार्केटच्या समोर टोरेस लिमिटेडने केलेल्या हेराफेरीचा आहे.या कंपनीचे बऱ्याच ठिकाणी ब्रान्चेस आहेत. इन्व्हेस्टमेंट केलेल्या नागरिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या कंपनीमध्ये पोलीस पंचनामा चालू आहे. थोड्याच वेळात अधिकृत माहिती मिळेल.
मीरा रोड आणि भाईंदरमधील शोरुम बंद
भाईंदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणाऱ्या एका शोरूममार्फत लोकांना पैसे गुंतवण्यास सांगत त्यांना काही रक्कम वर्षभर फायद्याच्या स्वरूपात मिळणार असल्याचे सांगून पैसे गुंतवून घेण्यात आले होते. मात्र सोमवारी अचानक शोरूम बंद झाल्याने लोकांची गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
शोरुमबाहेर लोकांची गर्दी
भाईदर पूर्वच्या रामदेव पार्क परिसरात असणाऱ्या आर्टिफिशल डायमंड विक्री करणाऱ्या टोरेस नामक कंपनीच्या मार्फत लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगत वर्षभर त्यांना त्यावर प्रत्येक आठवड्याला काही टक्के वारी प्रमाणे रक्कम खात्यात जमा होईल अशे सांगण्यात आले होते.मात्र आज अचानक सकाळी या शोरूमचे दादर येथील मुख्य कार्यालय बंद झाले आणि त्याच्यासोबत मीरा भाईंदरमधील शोरूम देखील बंद करण्यात आले. शोरूम बंद झाल्याची माहिती मिळताच पैसे गुंतवणूक केलेल्या लोकांची गर्दी जमा झाली. त्यांचे पैसे बुडल्याचे व त्यांच्या सोबत फसवणूक झाल्याचे समजताच लोकांनी राग व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.