Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

350 राण्या, रोज 9 किलो जेवण अन् जेवणात पक्ष्यांचा मेंदू खाण्याची आवड... कोण आहेत हे भारतीय राजे?

350 राण्या, रोज 9 किलो जेवण अन् जेवणात पक्ष्यांचा मेंदू खाण्याची आवड... कोण आहेत हे भारतीय राजे?
 

भारतातील अशा अनेक राजांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, जे त्यांच्या ऐशोरामासाठी प्रसिद्ध होते, पण महाराज भूपिंदर सिंह यांची कथा काही वेगळीच आहे. पटियाला संस्थानाचे महान राजा असलेले महाराजा भूपिंदर सिंह हे त्यांच्या अपार ऐश्वर्य आणि विलासी जीवनासाठी ओळखले जात होते.

त्यांच्या जीवनातील अनेक कथा आजही चर्चेचा विषय आहेत. असा म्हटलं जातं की, राजाने आपल्या सेवेसाठी 350 स्त्रिया ठेवल्या होत्या. इतकंच नाहीतर ते दिवसाला तब्बल ९ किलो जेवण करत असत. त्यांनी बनवलेला पटियाला पेग आणि पटियाला नेकलेस आजही प्रसिद्ध आहेत."

जेवणाचे शौकीन महाराज भूपिंदर सिंह : महाराजा भूपिंदर सिंह यांना खाण्याची खूप आवड होती. लॅरी कॉलिन्स आणि डोमिनिक लॅपिएरे यांनी 'फ्रीडम ॲट मिडनाईट' या त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, "ते दिवसाला 20 पौंड जेवण करत असत किंवा चहाच्या वेळी दोन कोंबड्या खात असत." महाराजांची जेवणाची पद्धत खूपच अनोखी होती. असे म्हटले जाते की, ते पक्ष्यांचे मेंदूही खात असत. त्यांचे जेवण केवळ मोठेच नव्हे, तर विविधतेने परिपूर्ण असे."

महाराजांच्या स्त्रियांसंबंधी गोष्टी : महाराजा भूपिंदर सिंह यांच्या शारीरिक इच्छांबद्दल काही मनोरंजक तथ्येही समोर आली आहेत. त्यांचा एक मोठा हरम होता, ज्यात त्यांनी आयुष्यभर 350 स्त्रिया ठेवल्या होत्या. त्यांनी आपल्या हरममधील स्त्रियांचे सौंदर्य आणि आकर्षण अधिक वाढवण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटनमधून प्लास्टिक सर्जननाही बोलावले होते. यावरून दिसून येते की, ते आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होते. पटियालामध्ये असे म्हटले जात होते की, महाराज आपल्या आवडत्या स्त्रिया बर्फाने भरलेल्या स्विमिंग पूलच्या आसपास ठेवत असत, जेणेकरून ते एका हाताने त्यांना स्पर्श करू शकतील किंवा स्विमिंग करताना व्हिस्कीचा ग्लासचा आनंद घेऊ शकतील. यावरून त्यांच्या जीवनातील ऐशोआराम आणि त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी दिसून येतात.

महाराज आणि एडॉल्फ हिटलर यांचे खास संबंध : 1935 मध्ये जर्मनीचे चॅन्सेलर एडॉल्फ हिटलर यांनी महाराजा भूपिंदर सिंह यांना एक आलिशान मेबॅक कार भेट दिली, तेव्हा महाराजांचे जीवन आणखी रोचक बनले. ही कार हिटलरसोबतच्या त्यांच्या खास संबंधाचे प्रतीक बनली. या घटनेवरून दिसून येते की, महाराजांचे संबंध केवळ भारतातील राजघराण्यांशीच नव्हे, तर परदेशातही होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.