मिरजेत नशेच्या गोळ्या, इंजेक्शन:,
महात्मा गांधी चौक पोलिसांकडून साठा जप्त; तिघांना अटक,
14 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त
सांगली:-
आरोग्य पंढरी असलेल्या सांगली, मिरज शहरात नशेची औषधे विकणाऱ्या टोळीच्या मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुसक्या आवळल्या. या प्रकरणी सांगलीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६ लाख १६ हजार रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या व इंजेक्शन तसेच ८ लाख ३० हजार रुपये किमतीची चारचाकी व मोटारसायकल असा एकूण १४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
रोहित अशोक कागवाडे (वय ४४, रा. शामरावनगर, सांगली), ओंकार रवींद्र मुळे (वय २४, रा. गर्व्हर्मेट कॉलनी, विजय कॉलनी, विश्रामबाग सांगली) व आशपाक बशीर पटवेगार (वय ५०, रा. असुबा हॉटेलसमोर, पत्रकारनगर, सांगली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मिरज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, पोलीस उप अधीक्षक प्रणील गिल्डा, महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गुरव, उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, अभिजित पाटील, सूरज पाटील, अभिजित धनगर, नानासाहेब चंदनशिवे, राहुल क्षीरसागर, अमोल तोडकर, विकास कांबळे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोसिन टीनमेकर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.