Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अखेर साथीदारांचा बदला घेतलाच, विजापुरात 12 नक्षलवाद्यांचा खात्मा

अखेर साथीदारांचा बदला घेतलाच, विजापुरात 12 नक्षलवाद्यांचा खात्मा
 

विजापूर (छत्तीसगड) : नववर्षाच्या आठवड्याभरातच म्हणजेच 06 जानेवारी 2025 ला छत्तीगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडी स्फोटात आठ जवानांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर देशावर शोककळा पसरली होती. त्यामुळे ज्या नक्षलवाद्यांमुळे जवानांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांचा खात्मा करण्यात यावा, अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात होती. पण या घटनेच्या 10 दिवसांमध्येच सुरक्षा दलांनी विजापुरात सर्च ऑपरेशन करत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. आज शुक्रवारी (ता. 16 जानेवारी) सकाळपासूनच सुरक्षा दलाच्या विविध बटालियनकडून विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांकडून ही मोठी कारवाई सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांतील जवानांनी आपल्या आठ साथीदारांचा बदला घेत एकाच दिवशी केलेल्या विविध कारवायांमध्ये 12 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले आहे. विजापूर आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांकडून मोठी कारवाई सुरू आहे. सकाळपासून नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या गोळीबारात 12 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून, हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिसांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआरसह अनेक हायटेक शस्त्रेही जप्त केली आहेत. DRG विजापूर, DRG सुकमा, DRG दंतेवाडा, कोब्रा 204, 205, 206, 208, 210 आणि CARIPU 229 बटालियनचा या ऑपरेशनमध्ये सहभाग आहे.

सर्व बटालियनचे सैनिक नक्षलवाद्यांविरोधात मोठ्या कारवाया करत आहेत. अजूनही विजापूरमधील मरुधबाका आणि पुजारी कांकेर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सध्या लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक पोलिसांनीदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. विजापूरच्या मारुढबाका आणि पुजारी कांकेर परिसरात अजूनही सुरक्षा दलातील जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईमध्ये कोणकोणत्या खतरनाक नक्षलवाद्याचा खात्मा झाला, याबाबतची माहिती आता लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड राज्यातील विजापूर येथील कुत्रू जंगलात सोमवारी, 6 जानेवारी रोजी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनाला भूसुरुंग लावून उडवले होते. या दुर्दैवी घटनेत 8 जवान शहीद झाले, तर एका चालकाचाही मृत्यू झाला होता. हे सर्व सैनिक अबुझमद भागात नक्षलविरोधी अभियान राबवून परतत होते. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरला होता. पण आता 10 दिवसांमध्येच सुरक्षा दलांनी आपल्या साथीदारांच्या बलिदानाचा बदला घेतला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.