Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! रात्री 12 वाजता आमदारानं गोळी झाडून स्वत:ला संपवलं

धक्कादायक! रात्री 12 वाजता आमदारानं गोळी झाडून स्वत:ला संपवलं
 

लुधियाना: दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि आप पुन्हा चर्चेत आलं असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात बायको मुलं असताना अचानक आमदारानं टोकाचं पाऊल उचललं. या आमदारानं बायको मुलं घरात असताना जे केलं त्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमदाराने घरात बायको, मुलं असताना स्वत:ला संपवलं आहे. त्याने हे टोकाचं पाऊल उचलण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. आमदाराचा मृतदेह घरात पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. आमदाराने आपल्या लायसन्स रिवॉल्वरने गोळी मारुन आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरू आहे.

हलका पश्चिम आप आमदार गुरप्रीत गोगी यांनी आयुष्य संपवलं, मध्यरात्री 12 वाजता त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवले. शुक्रवारी, आपचे आमदार गुरप्रीत गोगी एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर संध्याकाळी उशिरा घरी पोहोचले.

गोगी रात्री उशिरा घरी आल्यानंतर थेट ते आपल्या खोलीत गेले. त्याच्या खोलीत जेवत असताना अचानक त्याच्या खोलीतून गोळीबार झाल्याचा आवाज आला. गोळीचा आवज ऐकून त्यांच्या पत्नी डॉ. सुखचैन बस्सी खोलीकडे धावल्या. खोलीत गोगी रक्ताच्या धारोळ्यात होते, ते पाहून पत्नीला मोठा धक्का बसला. आमदार गोगींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. गोगी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालयाबाहेर गोगी यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेपूर्वी पत्नीसोबत काही भांडण झाले होते का किंवा आमदार एखाद्या गोष्टीमुळे नाराज होते का, याची चौकशी पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.