Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जळगाव :- 10 वीच्या गेट टू गेदरमध्ये दाम्पत्याचा आयुष्याचा शेवट, 5 वर्षांच्या मुलीसमोर आई-बाबांनी गमावला जीव

जळगाव :- 10 वीच्या गेट टू गेदरमध्ये दाम्पत्याचा आयुष्याचा शेवट, 5 वर्षांच्या मुलीसमोर आई-बाबांनी गमावला जीव
 

जळगाव : मकर संक्रांतीचं निमित्त आणि दहावीच्या बॅचचं गेट टू गेदर दोन्ही एकत्रच ठेवलं होतं. त्यामुळे दोन्ही कार्यक्रम एकत्र उरकूनच पुन्हा कामासाठी उल्हासनगरला यायचं असं सोनवणे दाम्पत्यांनी ठरवलं. शाळेतले किस्सा, जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होणार याचा आनंद होता. सगळं काही सुरळीत पार पडलं. दहावीचं गेट टू गेदरही झालं. गप्पा आठवणी भरभरुन मित्र मैत्रिणींचं प्रेम सारं काही मनात साठवून सोनवणे दाम्पत्य परतीच्या प्रवासाला निघाले.


अमळनेरहून मुंबईच्या दिशेनं निघाले असताना वाटेत दाम्पत्यासोबत भयंकर घडलं. ते ज्या ट्रॅव्हल्सने येत होते, त्याच गाडीचा पहाटे तीनच्या दरम्यान भीषण अपघात झाला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर येथे पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बस एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात, दाम्पत्याचा मृत्यू झाला असून त्यांची लेक थोडक्याच बचावली. ही धक्कादायक घटना मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ घडल्याची माहिती मिळाली आहे.

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मारवड इथे दहावीच्या वर्गातील गेट टुगेदरसाठी गावी आलेल्या पियुष सोनवणे आणि वृंदा सोनवणे-पाटील या पती-पत्नीचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. या अपघातातून त्यांची पाच वर्षाची मुलगी कृष्णाली वाचली. ती पोरकी झाली, आई वडिलांचं छत्र हरपलं. या अपघातात कृष्णाली त्यांची मुलगी थोडक्यात वाचली. तिच्या हाताला दुखापत झाली असून तो फॅक्चर आहे.

सोनवणे दाम्पत्य दहावीच्या बॅचच्या गेट टुगेदरसाठी मागील चार दिवसापासून आपल्या मारवड गावी आले होते. या दरम्यान त्यांची मित्र- परिवार, नातलगांची भेट शेवटची ठरली. या दुर्घटनेमुळे सोनवणे-पाटील दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दहावीच्या गेट टू गेदरच्या आठवणी सोबत घेऊन निघालेल्या या दाम्पत्यावर काळाने घाला घातला अन् मृत्यूनं वाटेत गाठलं. हे दाम्पत्य उल्हासनगरमधील रहिवासी होते अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.