धमतरी: छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तिथे एका तरुणाने आत्महत्या केली आहे. त्यामागचं कारण धक्कादायक आहे. त्या तरुणाची पत्नी आणि सासरची मंडळी त्याच्यावर धर्मांतरासाठी बऱ्याच काळापासून दबाव टाकत होते.
त्याला वैतागून अखेर त्याने आत्महत्या केली. मरण्याआधी त्याने व्हॉट्सॅप स्टेटसही ठेवलं होतं. लिनेश साहू असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो धमतरीमधल्या अर्जुनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या पोटियाडीह गावात राहायचा. वर्षभरापूर्वीच म्हणजे गेल्या सप्टेंबरमध्ये रायपूरमधल्या करुणा हिच्याशी त्याचं लग्न झालं होतं. सात डिसेंबर रोजी त्याचा मृतदेह घरात लटकत असलेल्या स्थितीत सापडला होता. पोलिसांना माहिती कळताच ते घटनास्थळी गेले. त्यांनी तपास सुरू केल्यावर त्यांच्या असं लक्षात आलं, की लिनेश साहू याने मरण्यापूर्वी व्हॉट्सॅप स्टेटस अपडेट केलं होतं. तसंच, त्याने नातेवाईकाला मेसेज पाठवून सुसाइड नोटही पाठवली होती. त्याची पत्नी आणि सासरकडची मंडळी त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून ताणाखाली होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकाने दिली.
त्याने व्हॉट्सॅपवर असं लिहिलं होतं, की 'मी माझी पत्नी आणि सासरकडच्या मंडळींमुळे हैराण झालो आहे. कारण ते माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकत आहेत. मी सासरी गेलो, तेव्हा पत्नी, सासू आणि दोन मेव्हण्या यांनी माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला, त्रास दिला. त्यांनी असं सांगितलं, की त्या नंतर माझी आई आणि वडिलांना त्याबद्दल समजावतील.'
लिनेशने सात डिसेंबर रोजी पहाटे 3.43 वाजता आपल्या बहिणीच्या पतीला व्हॉट्सॅपवर मेसेज पाठवला होता. पोलिसांनी अशी माहिती दिली, की लिनेशची पत्नी करुणा (27), तिचे आई-वडील राजकुमार (54) आणि गौरी साहू (48), तिची बहीण किरण (31) यांना लिनेशला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. करुणाची छोटी बहीण कनिष्का साहू हिला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.