Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील VIDEO, मुंबईतल्या कोर्टात नक्की काय घडलं?

सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील VIDEO, मुंबईतल्या कोर्टात नक्की काय घडलं?
 

मुंबई : कोर्टात सुनावणी सुरू असताना स्क्रीनवर अचानक अश्लील व्हिडीओ सुरू झाल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार केवळ एकदाच घडला नाहीये, तर दोन वेगवेगळ्या दिवशी घडला.

पहिल्यांदा अशाप्रकारे व्हिडीओ सुरू झाल्यानंतर कोर्टानं याकडे दुर्लक्ष केलं होतं. मात्र पुन्हा तोच प्रकार घडल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अज्ञातानं कोर्टाची वेबसाईट हॅक करून हा प्रकार केल्याचा दावा केला जातोय, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार मुंबई येथील राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाच्या कोर्टात घडला आहे. १२ डिसेंबर आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस काही मिनिटांसाठी स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ सुरू करण्यात आला होता. कोर्टाची यंत्रणा हॅक करून हा प्रकार केल्याचं लक्षात आल्यानंतर तातडीने मुंबईतील कफ परे़ड पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीएलटीचे डेप्युटी रजिस्ट्रार चरण प्रताप सिंह यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञातांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, १२ डिसेंबरला दुपारी १ वाजून ८ मिनिटांनी कोर्टाच्या वेबसाईटवर अश्लील व्हिडीओ सुरू झाला होता. जवळपास तीन मिनिटं ही क्लिप सुरू होती. हॅकरने कोर्टाची वेबसाईट हॅक करून हा प्रकार केला होता. ही घटना ताजी असताना १७ डिसेंबरला पुन्हा याच नावाने कोर्टातील स्क्रीनवर अश्लील क्लिप सुरू करण्यात आली. जवळपास ११ मिनिटं ही क्लिप सुरू होती.

त्यानंतर दुसऱ्या नावाच्या आणखी एका व्यक्तीने कोर्टाची वेबसाईट हॅक करून कोर्ट क्रमांक ४ आणि कोर्ट क्रमांक ५ च्या स्क्रीनवर अश्लील व्हिडीओ प्ले करत न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण केला. हा प्रकार समोर आल्यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची आयपी अॅड्रेसही पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.