Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ट्रकची धडक अन् कंटेनर SUV वर पलटी; बंगळुरुत सांगलीतील कुटुंबाचा अपघाती अंत, ६ जण दगावले :, हे कुटुंब ख्रिसमसची सुट्टी साजरी करण्यासाठी निघालं होतं.

ट्रकची धडक अन् कंटेनर SUV वर पलटी; बंगळुरुत सांगलीतील कुटुंबाचा अपघाती अंत, ६ जण दगावले :, हे कुटुंब ख्रिसमसची सुट्टी साजरी करण्यासाठी निघालं होतं. 


बंगळुरु येथे एका भीषण अपघातात सांगलीच्या एक अख्खं कुटुंब संपले आहे. हे कुटुंब ख्रिसमसची सुट्टी साजरी करण्यासाठी निघालं होतं. मात्र, वाटेतच या कुटुंबाला नियतीने हेरलं. या घटनेने सांगलीत खळबळ माजली आहे.

 बंगळुरूः कर्नाटकातील बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील नेलमंगला राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच जण महराष्ट्रातील सागंली येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कंटेनर ट्रकच्या धडकेनंतर एक कंटेनर कार आणि दुचाकीवर पलटी झाला, त्यामध्ये चिरडून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात नेलमंगला तालुक्यातील टी बेगूर भागात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्य दोन ट्रकची धडक झाली. त्यानंतर एक कंटेनर कार आणि दुचाकीवर पलटी झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातावेळी कारमध्ये पाच जण होते, त्यात दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बेंगळुरू ग्रामीण एसपी सीके बाबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, "नेलमंगला येथील टी बेगूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीवर कंटेनर उलटल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. मृतामध्ये पती चंद्रम इगाप्पागोळ (४६), पत्नी धोराबाई (४०) मुलगा गण (16), मुली दिक्षा (10), आर्या (6), चंद्रम एगाप्पागोळ भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी (३५) यांचे निधन झाले आहे. चंद्रम इगाप्पागोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोराबागी गावातील रहिवासी आहेत. ते बेंगलोर येथे सॉफ्टवेअर कंपनीत होते. तर नेलमंगला वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.