Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

RuPay आणि Visa Card मध्ये फरक काय? 90% लोकांना माहितीच नाही

RuPay आणि Visa Card मध्ये फरक काय? 90% लोकांना माहितीच नाही
 

मुंबई : आजकाल ऑनलाइन व्यवहारांचा कल झपाट्याने वाढत असून कॅशचा वापर कमी होत आहे. लोक ऑनलाइन ट्रांझेक्शनसाठी नेटबँकिंग आणि UPI चा वापर करतात. बरेच लोक कार्डद्वारे कॅशलेस पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. तुम्हीही कार्ड वापरत असाल तर या कार्डावर RuPay किंवा Visa लिहिलेले असेल हे तुम्ही पाहिले असेल. बरेच लोक ही कार्डे वापरतात परंतु त्यांना त्यांच्यातील फरक माहित नसतो. चला यातील फरक जाणून घेऊया.

 
रुपे कार्ड म्हणजे काय?
NPCI, म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 2012 मध्ये रुपे कार्ड लाँच केले. हे भारताचे पहिले जागतिक कार्ड पेमेंट नेटवर्क आहे. हे भारतीय पेमेंट नेटवर्कशी जोडलेले आहे आणि केवळ भारतातच नाही तर जगभरातील 200+ देश आणि प्रदेशांमध्ये 42.4 दशलक्ष POS लोकेशंस आणि 1.90 मिलियन एटीएम लोकेशन्सवर स्वीकारले जाते.

 
Visa Card म्हणजे काय?

तुमच्या डेबिट कार्डवर Visa लिहिलेले असेल तर ते Visa नेटवर्क कार्ड आहे. कंपनी इतर वित्तीय संस्थांसोबत भागीदारीद्वारे ही कार्ड जारी करते. हे जगातील सर्वात मोठे पेमेंट नेटवर्क आहे. व्हिसा कार्डचे अनेक प्रकार आहेत जसे - क्लासिक, गोल्ड, प्लॅटिनम, सिग्नेचर आणि इन्फाइनाइट. सर्व कार्ड्सवर उपलब्ध असलेल्या सुविधाही वेगळ्या आहेत.

हे या दोन कार्डामधील फरक आहेत
Rupay Card हे देशांतर्गत असल्याने, इतर कार्डाच्या तुलनेत ट्रांझेक्शन फीस इत्यादी कमी आहेत. तर व्हिसा कार्डमध्ये रुपे च्या तुलनेत फी जास्त आहेत. भारताचे देशांतर्गत कार्ड असल्याने, Rupay ची ट्रांझेक्शन स्पीड, Visa आणि इतर पेमेंट नेटवर्कच्या तुलनेत जास्त वेगवान आहे. Rupay Card ग्रामीण भारताला लक्षात घेऊन लॉन्च करण्यात आले, तर व्हिसा कार्ड टियर 1 आणि टियर 2 शहरांमध्ये अधिक लोकप्रिय आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.