Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दोन मराठा उपमुख्यमंत्री, पुन्हा मुख्यमंत्री मराठा असावा अट्टाहास का? RSSची नाराजी

दोन मराठा उपमुख्यमंत्री, पुन्हा मुख्यमंत्री मराठा असावा अट्टाहास का? RSSची नाराजी
 

मुंबई : राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पाच डिसेंबरला होणार आहे. मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. मात्र यावर स्पष्टपणे अद्याप कुणीही माहिती दिलेली नाही. यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यमंत्री कोण होणार यावर होत असलेल्या चर्चा आणि जातीय समीकरणांच्या आधारावर निर्णय घेण्याच्या शक्यतेवरून भाजपवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री पदासाठी जातीय समीकरण पुढे करत मराठा, ओबीसी नेत्यांची नाव पुढे येत असल्याने संघ परिवारात नाराजीची चर्चा आहे. दोन मराठा उपमुख्यमंत्री असताना, पुन्हा मुख्यमंत्री मराठा असावा हा अट्टाहास कशासाठी असा सवाल संघ परिवारातून विचारला जात आहे. केवळ जातीच्या आधारावर मुख्यमंत्री निवड करण अयोग्य आहे. याचा परिणाम संघाच्या कार्यकर्त्यांवर होऊ शकतो अशा शब्दात संघाने आपली नाराजी व्यक्त केलीय.

 

आरएसएसने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवावं असं म्हटलंय. विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीला मोठा विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे आरएसएसची पहिली पसंती फडणवीस आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये एक गट मुख्यमंत्रिपदासाठी इतर दावेदारांचे नाव पुढे करत आहे. ''हिंदुस्तान टाइम्स''ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

राज्यात विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचीही नावे चर्चेत आहेत. विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ हे मराठा समाजातील आहेत तर बावनकुळे ओबीसी चेहरा आहेत. या संभाव्य नावांमुळे जातीय समीकरणांच्या चर्चा रंगल्या आहेत. मराठा आणि ओबीसी समाजाने विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली. या नेत्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री निवडताना या गोष्टीही लक्षात घेतल्या पाहिजेत.

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीबाबत काही स्पष्टता नसल्यानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज आहे. आऱएसएसने निवडणुकीवेळी फडणवीस यांचे समर्थन केले होते. आरएसएसच्या योजनेंतर्गत ३ हजार स्वयंसेवकांनी प्रत्येक जिल्ह्यात मोहीम चालवून महायुतीच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

आरएसएसच्या फ्रंटल संघटनेपैकी असलेल्या ''राष्ट्रीय मुस्लिम मंचा''शी संबंधित एका आरएसएसच्या नेत्यानं म्हटलं की, ''फडणवीस यांची निर्णायक भूमिका पाहता त्यांना मुख्यमंत्री म्हणून निवडलं पाहिजे असा स्पष्ट संदेश आरएसएसने भाजप नेतृत्वाला दिला आहे. असं केलं नाही तर पक्षाला आगामी निवडणुकीत विशेषतः बीएमसी निवडणुकीत मोठा फटका बसेल.''

आरएसएसने ज्या चार नेत्यांना तयार केलं ते संघाच्या मार्गदर्शनाचं पालन करत नसल्यानंही आरएसएस नाराज आहे. संघाचं म्हणणं आहे की, अजित पवार, एकनाथ शिंदे हे दोन्ही मराठा समाजातील आहेत. अशा स्थितीत भाजपच्या काही नेत्यांकडून मराठा मुख्यमंत्र्यावर जोर देण्याचं काही ठोस कारण नाहीये.
आरएसएसच्या एका वरिष्ठ कार्यकर्त्याने सांगितलं की, ''हा मुद्दा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसमोर उपस्थित केला गेला तेव्हा मुरलीधर मोहोळ यांना स्पष्ट करावं लागलं की मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आलंय ही फक्त अफवा आहे.'' मोहोळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ''पक्षाची शिस्त आणि निर्णय हा अंतिम आहे'' असं सांगत सोशल मीडियावरील चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.