भारतीय रिझर्व्ह बँकेत गर्व्हनर सर्वात मोठं पद आहे. नुकतीच रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते बुधवारी (11 डिसेंबर) रोजी या पदाचा कार्यभार स्विकारतील.
त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. शक्तीकांत दास यांच्याकडून ते सूत्रं हाती घेतील. या घडामोडीनंतर आरबीआय गर्व्हनरची नियुक्ती कशी होते, त्यासाठीची पात्रता काय असते, त्यांची सॅलरी किती असते यावर चर्चा सुरू झाली आहे. RBI गर्व्हनरची नियुक्ती रिझर्व्ह बँक अधिनियमानुसार केंद्र सरकारद्वारा केली जाते. भारतीय नोटेवर आरबीआय गर्व्हनरांची स्वाक्षरी असते. आरबीआयच्या स्थापनेनंतर आतापर्यंत 25 गर्व्हनरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आरबीआय गर्व्हनर हे एक उच्चपद आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. या पदासाठी बँकिंग आणि इकॉनॉमिक सेक्टरचा अनुभव आवश्यक आहे. सुरुवातील या पदावर भारतीय सिव्हील सेवा अधिकारी म्हणजेच आयएएस यांची नियुक्ती केली जात होती. मात्र आता पदवी, पदव्युत्तर, चार्टर्ड अकाऊंटंटची पदवी असलेली कोणतीही भारतीय व्यक्ती गर्व्हनर होऊ शकते. मात्र यासाठी त्या व्यक्तीजवळ अपेक्षित अनुभव आवश्यक आहे. जर त्या व्यक्तीकडे अर्थशास्त्राची पदवी असेल तर या पदासाठी फायदेशीर बाब आहे.
गर्व्हनर पदासाठी आवश्यक बाबी...
जागतिक बँक किंवा IMF मध्ये काम करण्याचा अनुभव.
अर्थ मंत्रालयात काम केलेले असावे.
बँकिंग आणि वित्तीय उद्योगात कामाचा समाधानकारक अनुभव.
बँकेचे अध्यक्ष किंवा महाव्यवस्थापक म्हणून काम केलेले असावे.
प्रतिष्ठित आर्थिक किंवा बँकिंग संस्थेमध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
भारताचा नागरिक असावा
वयोमर्यादा 40 ते 60 दरम्यान असावीबँकिंग किंवा आर्थिक क्षेत्रात कमीत कमी वीस वर्षांचा अनुभवप्रतिष्ठित बँकिंग, आर्थिक किंवा शैक्षणिक संस्थेत वरिष्ठ पदावर काम केलेले असावेकोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसावा
आरबीआय गर्व्हनरची नियुक्ती कोण करतं?
आरबीआय गर्व्हनरची नियुक्ती अपॉइंटमेंट कमिटी ऑफ कॅबिनेट म्हणजेच ACC यांच्याद्वारे केली जाते. याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. उमेदवारांची नियुक्ती योग्यता आणि अनुभवाच्या आधारावर निश्चित केली जाते.
आरबीआय गर्व्हनरची सॅलरी आणि सुविधा...
आरबीआय गर्व्हनरांना दरमहिन्याला अडीच लाखांची सॅलरी मिळते. याशिवाय सरकारकडून घर आणि ड्रायव्हरसह कार आणि अन्य सुविधा मिळतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.