Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंदिराच्या दानपेटीत चुकून पडला iPhone; त्यानंतर जे घडलं त्यानं भक्ताचं डोकंच चक्रावलं

मंदिराच्या दानपेटीत चुकून पडला iPhone; त्यानंतर जे घडलं त्यानं भक्ताचं डोकंच चक्रावलं
 

चेन्नई:  तामिळ सिनेमा पलयाथम्मनमध्ये एक महिलेकडून चुकून तिचं बाळ मंदिराच्या दानपेटीत पडतं त्यानंतर हे बाळ मंदिराची संपत्ती बनते या कथेभोवती सिनेमा चित्रिकरण होते. परंतु खऱ्या आयुष्यात चेन्नईजवळील थिरुपुरूरच्या अरुलामिगु कंदस्वामी मंदिरात असाच काही प्रकार समोर आला आहे. एक भक्ताच्या खिशातून मंदिराच्या दानपेटीत त्याचा आयफोन पडतो. सिनेमाप्रमाणे यातही मंदिराने आता हा आयफोन मंदिराची संपत्ती झाल्याचं सांगत तो परत देण्यास नकार दिला आहे.

विनायगपुरम येथे दिनेश नावाच्या भक्ताला शुक्रवारी रिकाम्या हाताने मंदिरातून परतावं लागले कारण दानपेटीत असलेली कुठलीही गोष्ट देवाची आहे असं सांगून मंदिर अधिकाऱ्यांनी त्यांचा फोन परत देण्यास नकार दिला परंतु त्याला सिम कार्ड आणि फोनमधील डेटा परत देण्याची तयारी मंदिर प्रशासनाने दाखवली आहे. दिनेश अलीकडेच त्याच्या कुटुंबासह मंदिरात दर्शनासाठी गेला होता. पूजेनंतर मंदिराच्या दानपेटीत पैसे टाकायला गेलेल्या दिनेश यांच्यासोबत हा प्रकार घडला. ते जेव्हा शर्टाच्या खिशातून पैसे काढत होते तेव्हा चुकून त्यांचा आयफोन दानपेटीत पडला. दानपेटी मोठी असल्याने त्यांना फोन परत काढणे शक्य झालं नाही.

 

घाबरलेल्या अवस्थेत भक्त दिनेशने मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला मात्र दानपेटीत पडलेली वस्तू किंवा पैसे हे मंदिराची संपत्ती मानली जाते ती परता देता येऊ शकत नाही. त्याशिवाय प्रथा परंपरेनुसार २ महिन्यातून केवळ एकदाच ही दानपेटी उघडली जाते. दिनेश यांनी याबाबत मंदिराच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिली. मात्र २ महिन्यांनी जेव्हा ही दानपेटी उघडली गेली तेव्हा फोन घेण्यासाठी धावले तेव्हा प्रशासनाने त्यांना अडवून केवळ सिम आणि मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा तुम्ही घेऊ शकता. 

हा फोन मंदिराकडेच राहील असं स्पष्ट सांगितले. दरम्यान, दिनेशने आधीच नवीन सिम घेतले होते तर फोन परत करण्याचा निर्णय मंदिर अधिकाऱ्यांवर सोडला होता. दानपेटीत पडलेली कुठलीही वस्तू मंदिर आणि देवाची मानली जाते, या परंपरेचे पालन केले जाईल. हा फोन आता मंदिराकडेच राहील. दानपेटीला लोखंडी कुंपणाने चांगले संरक्षित केले असल्याने त्यांनी तो फोन दान म्हणून टाकला आणि नंतर त्यांचा विचार बदलला की नाही हे आम्हाला स्पष्ट नाही असं मंदिराचे कार्यकारी अधिकारी कुमारवेल यांनी म्हटलं.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.