मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सर्वसमावेशक कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाचे अधिकारी घरोघरी जाऊन कागदपत्रांची उलट तपासणी करणार आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जातील, त्यानंतर सर्व डेटा तपासला जाईल. आणि पात्र, अपात्र ठरवले जाईल.
लाडकी बहीण योजनासाठी ज्यांनी खोटे दावे केलेत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असा प्रस्ताव महिला आणि बाल विकास विभागाने केला आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने मिळालेले लाभ परत करण्याचा पर्याय दिला जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. जिल्हा आणि विभागीय स्तरावर तपासणी केली जाईल, असे महिला आणि बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पडताळणी का केली जाणार ?
खोटी कागदपत्रे अथवा पात्रता नसताना लाडकी बहीण योजनेचा अनेकांनी लाभ घेतला आहे. तशा तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी होणार आहे. अपात्र असणाऱ्यां महिलांना योजनेतून वगळले जाईल.
लाभार्थीना स्वतःहून योजनेतून बाहेर पडण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. त्यासाठीचा जीआर जारी करण्यात आला आहे. याआधीच महिला आणि बाल विकास विभागाने खोट्या कागदपत्राद्वारे लाभ घेणाऱ्यांच्या तक्रारी करण्याचे आवाहन केलेय, जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितलेय.
राज्यात सर्वाधिक लाभार्थी पुण्यात -
राज्यात लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक पुण्यात आहेत. पुण्यामध्ये 20.8 लाख लाभार्थी पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीआधी एकूण 21,11,946 अर्ज आले होते, त्यापैकी 20,84,364 अर्ज स्वीकारण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
Numbers till now (before state poll)
२.६ कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला.
२.५ कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळाला.
१६ लाख महिलांच्या खात्यासोबत आधार लिंक नाही, त्यामुळे लाभ पोहचला नाही.
२.३ कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे मिळाले.
विधानसभा निवडणुकीआधी १७ हजार कोटी रूपये सरकारने महिलांच्या खात्यावर जमा केले.
रॅण्डम २.५ लाख अर्जाची पुन्हा तपासणी केली जाणार
महिला आणि बाल विकास विभागाकडे तक्रार आल्यानंतर काय?
त्या अर्जदारांचे उत्पन्नाचे दाखला आणि इतर कागदपत्रांची कडक तपासणी केली जाईल त्या लाभार्थ्यांच्या घरी सरकारी अधिकारी जाऊन सर्व कागदपत्रे, मुलाखत, सर्वेक्षणाद्वारे दाव्यांची पडताळणी करतील लाभार्थीचा डेटा मतदार यादीसोबत चेक केला जाईल. त्याशिवाय टॅक्स रेकॉर्ड आणि आधार डेटाबेसही तपासला जाईल. हेल्पलाइन नंबर, ऑनलाइन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे नागरिक लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्राची तक्रार करू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.