धक्कादायक! Cupcake मधून विषबाधा, कोल्हापुरात सख्या बहीण-भावासह 5 जणांचा मृत्यू
अन्नातून विषबाधा झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये सख्या बहीण-भावाचा समावेश आहे. ही घटना कागल तालुक्यातील चिमगावमध्ये घटली आहे. दोन्ही मुलांनी कपकेक खाल्ला होता. त्यातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे करवीर तालुक्यातील मांढरे गावामध्येही अन्नातून विषबाधा झाल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने पाच जण दगावल्याच्या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरला आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कागल तालुक्यातील चिमगाव आणि करवीर तालुक्यातील मांढरे गावात विषबाधेने एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे गावात एकच खळबळ माजली आहे. प्रशासन आता या घटनेच्या तपासात लागले आहे.
कपकेक खाल्याने बहीण-भावाचा मृत्यू
चिमगावमध्ये भाऊ-बहिणीचा मृत्यू कागल तालुक्यातील चिमगावमध्ये अन्नातून विषबाधा झाल्याने सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला आहे. श्रीयांश आणि काव्या अशी मृत मुलांची नावे आहेत. एका नातेवाईकाने आणलेला कपकेक दोन्ही मुलांनी खाल्ला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांच्यावर मृत्यू ओढवला. कपकेकमधून विषबाधा झाल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला आहे.दफन केलेले मृतदेह काढले बाहेर
कोल्हापूर ग्रामीण पोलिसांनी आता याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी दफन केलेले दोन्ही मृतदेह बाहेर काढून तपासणीसाठी नमुने पाठवले आहेत. मृत पावलेले श्रीयांश आणि त्याची बहीण काव्या यांचा शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूच्या कारणाचा तपास करण्यासाठी व्हिसरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
विषबाधेमुळे तिघांचा मृत्यू
करवीर तालुक्यातील मांढरे गावातही विषबाधेमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनांनंतर कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारे आणि पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अन्नाच्या स्रोताचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली आहे, ज्यामुळे विषबाधा झाली आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेमुळे पंचक्रोषित हळहळ व्यक्त केली जात आहे. संबंधित व्यक्ती विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.