Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खारघरमध्ये तुफान राडा! शिंदे गटाच्या नेत्याला CISF च्या जवानांनी बेदम चोपलं, नेमकं काय घडलं?

खारघरमध्ये तुफान राडा! शिंदे गटाच्या नेत्याला CISF च्या जवानांनी बेदम चोपलं, नेमकं काय घडलं?
 

नवी मुंबई : खारघरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

विशेष म्हणजे शिंदे गटाच्या नेत्यालाच नव्हे तर त्याच्या कुटुंबियांला देखील मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच सीआयएसएफच्या 10 ते 15 जवानांकडून ही मारहाण करण्यात आल्याची आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.या घटनेनंतर नवी मुंबईत एकच खळबळ माजली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, डॉ. श्रीनाथ परब व मित्र जयेश रात्री 10 च्या सुमारास कारने घरी परतत होते. यावेळी खारघरमधील प्रणाम हॉटेलसमोर सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवरील चालकाने डाव्या बाजूला अचानक गाडी वळवली. या घटनेनंतर डॉ. श्रीनाथ परब यांनी काही अंतर पुढे गेल्यावर बस चालकाला जाब विचारला.

दरम्यान जाब विचारल्याचा राग आल्याने गणवेशात असलेल्या 10 ते 15 जवानांनी बसमधून खाली उतरत तिघांना बेदम मारहाण केली आहे. यावेळी गाडीत अकरा महिन्याच्या बाळासह आई देखील होती. विशेषम म्हणजे सीआयएसएफच्या दहा ते पंधरा जवानांनी मारहाण करतानाचा झाला आहे.या व्हिडिओनंतर एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या मारहाणीच्या घटनेनंतर परब यांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.