Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तीन तास CID कडून चौकशी, वाल्मिक कराड पुन्हा बीडच्या दिशेने, पुढची कार्यवाही कशी? डीआयजींकडून क्लिअर

तीन तास CID कडून चौकशी, वाल्मिक कराड पुन्हा बीडच्या दिशेने, पुढची कार्यवाही कशी? डीआयजींकडून क्लिअर


पुणे : फरार वाल्मिक कराड गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे कार्यालयात शरण आल्यानंतर त्याची जुजबी चौकशी करून विशेष पथक त्याला बीडला घेऊन निघाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात वाल्मिकवर आरोप झाल्याने वाल्मिक फरार होता.


आज पहिल्यांदाच सीआयडीने वाल्मिकची चौकशी केली. या चौकशीत त्यांच्या हाताला काय लागले? याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

वाल्मिकच्या नावावर पवनचक्की प्रकरणातल्या खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद आहे. त्याचवेळी त्याच्यावर देशमुख हत्या प्रकरणाचेही थेट आरोप होत आहेत. या सगळ्याचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे असल्याने पथक कराडच्या मागावर होते. अखेर वाल्मिक कराड आज दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास अतिशय नाट्यमयरित्या गुन्हे अन्वेषण विभागाला शरण गेला. दुपारी १ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत त्याची जुजबी चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी सीआयडीच्या पथकासह त्याला बीडच्या दिशेने रवाना करण्यात आले.

कराडची CID कडून जुजबी चौकशी, डीआयजींनी स्वत: सांगितले

याविषयी अधिक माहिती देताना डीआयजी सारंग आवाड म्हणाले, आज दुपारी केज पोलिस स्टेशनमधला फरार आरोपी वाल्मिक कराड स्वत:हून सीआयडी मुख्यालयात हजर झाला. त्याला सीआयडी पुणे यांनी ताब्यात घेतले आहे. जुजबी चौकशी करून आमच्या टीमसह तपासी अंमलदार बीड सीआयडी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरिता रवाना केले आहे.

वाल्मिकला बीडला नेले, पुढची कार्यवाही काय असेल?


कराड याच्यासंदर्भातली पुढची कार्यवाही काय असेल? असे डीआयजी सारंग आवाड यांना विचारले असता पुढील चौकशीसाठी बीड सीआयडी पथकाचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करणार, आजच सायंकाळीच सुनावणी होणार, न्यायालयाकडून विनंती मान्य


वाल्मिक कराडला सायंकाळी सात ते साडे सात वाजण्याच्या सुमारास बीडच्या केज न्यायालयात हजर करण्यात येईल. गुन्हे अन्वेषण विभागाने विनंती केल्यानुसार कराड प्रकरणाची आज सायंकाळीच सुनावणी होणार असल्याची माहिती कळते आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.