Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की!

Breaking News!  MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की!
 
 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MBBS या वैद्यकीय परीक्षांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेपर सुरू होण्याच्या काही वेळ आधी एमबीबीएस द्वितीय वर्षाचा फार्मकोलॉजी -1 या विषयाचा पेपर परीक्षेच्या तासभर आधी थेट सोशल मीडियावर लिक झाल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला फेर परीक्षेची नामुष्की ओढवली आहे.

या पेपरसाठी राज्यभरातील 50 केंद्रांवर जवळपास 7,900 विद्यार्थी परीक्षेला बसणार होते. आता त्यांना 19 डिसेंबर रोजी फेरपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. पेपर फुटीमागील कारण शोधण्यासाठी विद्यापीठाने उच्चस्तरीय तपास समिती स्थापन केली आहे. याशिवाय सायबर सेलच्या मदतीने ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. कुलगुरूंनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे 2 डिसेंबरची परीक्षा रद्द करण्यात आली असून आता या विषयाची फेरपरीक्षा 19 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.
ऐन परीक्षेच्या दिवशी तासभर आधी MBBS परीक्षेचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यापीठाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत अधिक कडक उपाययोजना केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

नक्की झाले काय?
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) एमबीबीएस दुसऱ्या वर्षाच्या फार्माकोलॉजी-1 विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा पेपर थेट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 2 डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात होणाऱ्या या परीक्षेचा MCQ स्वरूपातील पेपर परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे एक तास आधी व्हायरल झाला. विद्यापीठाला या प्रकाराची माहिती ईमेलद्वारे मिळताच तातडीने परीक्षा रद्द करण्यात आली. राज्यभरातील 50 केंद्रांवर सुमारे 7,900 विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. परंतु आता पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेचा ताण सहन करावा लागणार आहे. या लीकची माहिती विद्यापीठाला ईमेलद्वारे मिळाली. ईमेलच्या स्त्रोताची तपासणी करण्यासाठी आणि संपूर्ण डिजिटल ट्रेलसाठी विद्यापीठ सायबर सेलचा समावेश करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नक्की पेपरफूटी झाली कशी?

पेपर फुटीमागील कारण शोधण्यासाठी विद्यापीठाने उच्चस्तरीय तपास समिती स्थापन केली आहे. याशिवाय सायबर सेलच्या मदतीने ईमेलचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. कुलगुरूंनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.