Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार : कुणी शपथ घेतली? कुणाचा पत्ता कट? संपूर्ण यादी एका क्लिकवर

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार : कुणी शपथ घेतली? कुणाचा पत्ता कट? संपूर्ण यादी एका क्लिकवर
 

आज (15 डिसेंबर) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडत आहे. फडणवीसांचं होमग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनदेखील सुरू होणार आहे, त्यामुळे नागपूर येथे मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्याचे समजतं. 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडत आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध नेत्यांच्या शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

या शपथविधीनंतर फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य नावांची जी चर्चा सुरु होती, ती आता थांबणार आहे. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील ते प्रमुख ओबीसी चेहरा असतील.

2. राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून सलग आठवेळा निवडून आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील सुमारे तीस वर्षे आमदार म्हणून निवडून येतात.

3. हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ सलग सहाव्यांदा आमदार बनले आहेत. 1999 पासून सलग मुश्रीफ यांनी इथून विजय मिळवला आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या समरजितसिंह घाटगे यांना पराभूत केलं होतं.

4. चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील चंद्रकांत पाटील हे पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मुंबईत जन्मलेल्या चंद्रकांत पाटील यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केलं आहे.

5. गिरीश गीता दत्तात्रय महाजन देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू समजले जाणारे जामनेरचे आमदार गिरीश महाजन हे देखील या मंत्रिमंडळात मंत्री असणार आहेत. जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

6. गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील 2009 पासून जळगाव ग्रामीणचे आमदार राहिलेल्या गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.

7. गणेश रामचंद्र नाईक ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. शिवसेनेमधून राजकीय प्रवासाची सुरुवात केल्यानंतर गणेश नाईक यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतरची वीस वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते.

8. दादाजी रेश्माबाई दगडू भुसे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दादा भुसे यांचं मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. 2004 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेल्या दादा भुसेंनी त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून आमदारकी भूषवली आहे.

9. संजय प्रमिला धुलीचंद राठोड संजय राठोड महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन आणि मृदा व जलसंधारण मंत्री या विभागांचे कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. संजय राठोड बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

10. धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मागील सरकारमध्ये कृषिमंत्री राहिलेल्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा संधी दिली आहे. परळीमधून मुंडे बंधू भगिनीची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

11. मंगलप्रभात लोढा मंगलप्रभात लोढा हे मुंबईच्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आले आहेत. लोढा हे एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री होते. मंगलप्रभात लोढा यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

12. उदय सामंत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा निवडून आलेले उदय सामंत हे देखील फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असतील. उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. 2004 आणि 2009 मध्ये उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

13. जयकुमार रावल देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात पर्यटन आणि रोजगार हमी मंत्री राहिलेल्या जयकुमार रावल यांनाही यावेळी मंत्रिपद देण्यात आलं आहे. जयकुमार रावल हे धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेडा विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करतात.

14. पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे मागच्या काही वर्षांमध्ये राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार बघितलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर आमदारकीची संधी देण्यात आलेली होती.

15. अतुल लीलावती मोरेश्वर सावे औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाझ जलील यांचा पराभव करून ते निवडून आले आहेत. अतुल सावे याआधी देखील मंत्री राहिलेले आहेत.

16. अशोक जनाबाई रामाजी उईके राळेगाव मतदारसंघाचे आमदार अशोक उईके यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अशोक रामजी उईके भारतीय जनता पक्षाचे दोनवेळचे आमदार आहेत. ते 2014 मध्ये राळेगाव मतदारसंघातून निवडून गेले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्री म्हणून संधी मिळाली. आता तिसऱ्यांदा आमदार झाल्यावर पुन्हा एकदा त्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

17. शंभुराज विजयादेवी शिवाजीराव देसाई शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचं मंत्रीपद कायम ठेवण्यात आलं आहे. देसाई देखील आज मंत्री म्हणून शपथ घेतील. शिंदेंच्या मंत्रिमंडळात ते गृहराज्यमंत्री होते.

18. आशिष मीनल बाबाजी शेलार आशिष शेलार यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे राज्यातील मुख्य नेत्यांपैकी शेलार एक आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघातून असिफ झकारिया यांचा त्यांनी यावेळी पराभव केला आहे. सलग तिसऱ्यांदा ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

19. दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंदापूर मतदारसंघाची निवडणूक लढवलेल्या दत्तात्रय भरणे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

20. आदिती वरदा सुनील तटकरे मागील सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या आदिती तटकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या त्या कन्या असून, याआधी देखील त्यांनी मंत्रिपद भूषवलं आहे.

21. शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले आमदार म्हणून निवडून आले आहेत. भोसले राजघराण्याचे वारस असलेले शिवेंद्रराजे भोसले सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

22. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

23. जयकुमार कमल भगवानराव गोरे सातारा जिल्ह्यातील माण-खटावचे आमदार जयकुमार भगवानराव गोरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. जयकुमार गोरे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.

24. नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील प्रमुख आदिवासी चेहरा ते असणार आहेत.

25. संजय सुशीला वामन सावकारे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. संजय सावकारे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती.

26. संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात त्यांना मंत्रिपद मिळालेलं नव्हतं. यावेळी मात्र संजय शिरसाट यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे.

27. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते प्रताप सरनाईक यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत प्रताप सरनाईक ओवळा माजिवडा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.

28. भरत विठाबाई मारुती गोगावले शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. कोकणातील महाड विधानसभा मतदारसंघातून भरत गोगावले चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली नव्हती. मात्र आता त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

29. मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद जाधव पाटील यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. नागपूरमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

30. नितेश नीलम नारायण राणे कोकणातल्या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना मंत्रिमंडळात पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. आमदार नितेश राणे हे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. नितेश राणे यांनी कणकवलीमधून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे पहिल्यांदा कणकवलीमधून आमदार झाले होते.

31. आकाश सुनीता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर आकाश फुंडकर यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगावचे आमदार आहेत. आकाश हे भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आहेत.

32. बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. बाबासाहेब पाटील हे मराठवाड्यातून आहेत.

33. प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभेचे आमदार प्रकाश आबिटकर यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. 
 
'या' नेत्यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

शिंदे सरकारमधल्या 'या' सात मंत्र्यांना डच्चू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राउंडवर नवनिर्वाचित सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला आहे. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या एकूण सात मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही.

तानाजी सावंत, सुधीर मुनगंटीवार आणि छगन भुजबळ
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण नसणार आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेलं नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार केला तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.