Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजपचे पक्षश्रेष्ठी माझे नातेवाईक, माझं कोणीही काही करू शकत नाही', मद्यधुंद सरकारी अधिकाऱ्याचा रुबाब; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिकवला धडा

'पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजपचे पक्षश्रेष्ठी माझे नातेवाईक, माझं कोणीही काही करू शकत नाही', मद्यधुंद सरकारी अधिकाऱ्याचा रुबाब; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिकवला धडा
 

धुळे : धुळे जिल्हा उद्योग केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा उद्योग केंद्रातील खादी ग्रामोद्योग प्रशासकीय अधिकारी कार्यालयात अधिकारी ऑन ड्यूटी दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले आहे.

शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या नशेखोर अधिकाऱ्याचा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे. जिल्हा उद्योग केंद्रातील प्रभारी ग्राम उद्योग अधिकारी विजय चाटी असे मद्यधुंद अधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने अधिकारीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून विजय चाटी हे नेहमीच कार्यालयात दारू पिऊन येत असल्याची माहिती नागरिकांनी शिंदे गट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती. गेल्या काही दिवसापासून विजय चाटी हे कार्यालयात दारूच्या नशेत असतात अशी तक्रार आली असता शिवसेनेने त्याची दखल घेत मद्यधुंद असलेल्या विजय चाटी यांना जाब विचारला, मात्र ते दारूच्या नशेत असल्याने ते उत्तर देऊ शकले नाहीत.

त्यांनी धुम्रपान देखील केलेले होते, त्यामुळे कार्यालय संपूर्ण घाण झाली असल्याचे दिसून आले, या नशेखोर अधिकाऱ्यातर्फे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला देखील नेहमीच सेवन केला जात असल्याचे समोर आले आहे. अनेक नागरिक बेरोजगार या ठिकाणी कामानिमित्त येत असतात मात्र त्यांची काम होत नाही, असं असताना अधिकारी जर दारू पिऊन कार्य देत असतील तर हे खपवून घेतले जाणार नाही असं म्हणत शिवसेने शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दारूसह महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा खाऊन कार्यालयात संबंधित अधिकारी सर्रासपणे सेवन करत असल्याचे देखील आले उघडकीस आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे नातेवाईक असून भाजपचे पक्षश्रेष्ठी माझे सर्व निकटवर्तीय असल्याने माझे कोणीही काही करू शकत नसल्याचे मद्यधुंद अधिकाऱ्याने म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.