चेंबूरमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांची धरपकड, परभणीत काय?; महाराष्ट्र बंदचा परिणाम कुठे कुठे?
परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. त्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका माथेफिरुने विटंबना केली होती. याप्रकरणी आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत परभणीत आंदोलन केले होते.
यावेळी जाळपोळ आणि दगडफेकही करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. यात सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा समावेश होता. मात्र काल परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत मृत्यू झाला. याप्रकरणी आज आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आंबेडकरी अनुयायींकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. सध्या या महाराष्ट्र बंदचे कुठे काय पडसाद उमटतात याचा आपण आढावा घेऊया.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी आंबेडकर अनुयायींनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. याप्रकरणी मुंबईतील चेंबूरमधील आंदोलकांना आंबेडकरी अनुयायांनी ताब्यात घेतलं आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानतंर चेंबूरमध्ये आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन सुरु होते. यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी बाळासाहेब आंबेडकर अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. सध्या घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. यामुळे घाटी रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
परभणीत झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लातूरच्या गंजगोलाई बाजारपेठेसह औसा आणि मुरुड येथील बाजारपेठ सकाळपासूनच बंद ठेवण्यात आली आहे. तसेच एसटी बस आणि अत्यावश्यक सेवा सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.