समाज कल्याण विभागाची भन्नाट योजना! राज्यातील 'या' कुटुंबाला आता
मोफत २ ते ४ एकर जमीन; लाभार्थींना 'या' योजनेतून करावा लागेल लगेचच अर्ज
सोलापूर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील भूमिहिन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना दोन एकर बागायत किंवा चार एकर जिराईत जमीन १०० टक्के अनुदान स्वरुपात खरेदी करुन दिली जात असल्याची माहिती समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली.
जिल्हा समितीच्या मान्यतेने पारदर्शक पध्दतीने योजनेचा पात्र अर्जदारांना लाभ दिला जातो. दारिद्रय रेषेखालील भूमीहिन अनुसुचित जाती तथा नवबौध्द प्रवर्गातील परित्यक्ता स्त्रिया, दारिद्रय रेषेखालील भूमीहिन अनुसुचित जाती तथा नवबौध्द विधवा स्त्रिया, अनुसुचित जाती /जमाती कायद्यांतर्गत जातीचे आत्याचारग्रस्त, अशा घटकांना लाभार्थी निवडीत प्राधान्य देण्यात येते. महसुल विभागाने गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केलेल्या कुटुंबांना लाभ दिला जात नाही. या योजनेंतर्गत जमीनीचे वाटप झाल्यानंतर संबंधित लाभधारकाने स्वत: जमीन कसणे आवश्यक आहे. दुसरीकडे अन्य व्यक्तीस, संस्थेस हस्तांतरण व विक्री करता येत नाही. तसेच लीजवर भाडेपट्याने देखील देता येत नाही.
दरम्यान, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमीन असू नये, जमीन सलग असावी, शेतजमीन विनाबोजा व कुळ नसलेली असावी, जमीन कोठेही गहाण अथवा वादग्रस्त नसावी. जमीन विक्रीच्या अर्जावर शेतजमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकाशिवाय संबंधिताच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची जमीन विक्रीस संमतीबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
जिरायती एकर ५ लाखाला तर बागायती ८ लाखास विकत घेतली जाते
जे जमीन मालक जिरायत जमीन कमाल पाच लाख रुपये प्रतीएकर व बागायत जमीन कमाल आठ लाख रुपये प्रती एकर प्रमाणे विक्री करण्यास तयार आहेत, त्यांनी जमिनीच्या 7/12 व आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त् समाज कल्याण, कार्यालय, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसुचित जाती नवबौध्द घटकातील पात्र लाभार्थ्यांनी कार्यालयाकडे शासनाच्या विहित नमुन्यात अर्ज करावा, असेही आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.
योजनेचे निकष...
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसुचित जातीचा दारिद्र्य रेषेखालील असावालाभार्थी कुटुंब प्रमुखाचे वय ६० वर्षापेक्षा कमीअसावे, कुटुंबातील 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीला लाभ घेता येईललाभार्थी विक्रीसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावाचा रहिवाशी असावाज्या गावात जमीन उपलब्ध आहे त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची प्रथम निवड करण्यात येईल व त्या गावातील लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या गावातील लाभार्थ्यांची निवड चिठ्ठी टाकून होईल
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.