Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विकास आराखड्याचे नकाशे तात्काळ मंजूर करा नकाशाअभावी शहराचा विकास रखडलाआमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत उपस्थित केला औचित्याचा मुद्दा

विकास आराखड्याचे नकाशे तात्काळ मंजूर करा नकाशाअभावी शहराचा विकास रखडला आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत उपस्थित केला औचित्याचा मुद्दा
 

सांगली 19 डिसेंबर24 :- सांगली मिरज ,कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील विकासकामे  आणि नवीन बांधकामे विकास आराखड्याच्या नकाशा अभावी  खोळंबली आहेत. या सर्व प्रकारामुळे जनतेध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार होत आहे. सबब, अधिसूचनेतील निर्णयांचे  दोन्ही नकाशे अंतिम करुन मंजूर करावेत व त्यांना तत्काळ प्रसिद्ध करण्यात यावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना मागणी केली.
 
आमदार गाडगीळ यांनी विधानसभेत सांगली महापालिका विकास आराखड्याबाबत प्रश्‍न उपस्थित केला. आमदार गाडगीळ म्हणाले,  सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची मंजूर फेरबदलांचे (डच्) विकास योजनेची अधिसूचना दि. 4 एप्रिल2012 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तसेच दिनांक 2जानेवारी 2015 रोजी नगरविकास विभागाकडून शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरील हरकती सुचनांचा विचार होऊन दिनांक 3 मार्च 2016 रोजी उर्वरित सारभुत स्वरुपाच्या फेरबदलांची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. वास्तविक दिनांक 4एप्रिल2012 व 3 मार्च2016 या दोन्ही अधिसूचनांचे प्रसिद्धी सोबतच त्यांचे विकास योजनेचे नकाशे ही प्रसिद्ध होणे आवश्यक होते. परंतु अधिसूचनेतील निर्णयांचे डच् व एझ चे दोन्ही नकाशे अद्यापही तयार होऊन प्रसिद्ध झालेले नाहीत व महानगरपालिकेकडे आजअखेर शासनाकडून उपलब्ध झालेले नाहीत. या दोन्ही नकाशाच्या शासन निर्णयांमध्ये काही त्रुटी व विसंगती आहेत.



त्यासाठी शासनाच्या नगररचना आणि नगरविकास विभागाने दुसर्‍या शुद्धीपत्रकाचा प्रस्ताव  नगरविकास मंत्री यांच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. या सदरच्या दुसर्‍या शुद्धीपत्रकाच्या मंजूरीस सादर केलेला प्रस्ताव मागील बर्‍याच कालावधीपासून प्रलंबित आहे. यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे खोळंबली आहेत. तीनही शहरांचा विकासकामे व नवीन बांधकामे खोळंबली आहेत. या सर्व प्रकारामुळे जनतेध्ये शासनाविरोधी प्रचंड असंतोष तयार होत आहे. तरी अधिसूचनेतील निर्णयांचे डच् व एझ चे दोन्ही नकाशे अंतिम करुन मंजूर करावेत व त्यांना तत्काळ प्रसिद्ध करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.