Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयुर्वेदिक/आयुष डॉक्टर आणि अॅलोपेथी डॉक्टर समान नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार

आयुर्वेदिक/आयुष डॉक्टर आणि अॅलोपेथी डॉक्टर समान नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा पुनरुच्चार
 
 
विशेष रजा याचिका फेटाळताना, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच पुनरुच्चार केला की आयुर्वेदिक/आयुष डॉक्टर आणि अॅलोपेथी डॉक्टर समान नाहीत. शैक्षणिक पात्रता आणि संबंधित पदवी अभ्यासक्रमांच्या दर्जामधील गुणात्मक फरक लक्षात घेऊन हा आदेश पारित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
 
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. ‘केरळमध्ये सेवा देणारे आयुर्वेदिक किंवा आयुष डॉक्टर, शैक्षणिक पात्रता आणि संबंधित पदवी अभ्यासक्रमांच्या दर्जाबाबत गुणात्मक फरक लक्षात घेऊन, वैद्यकीय डॉक्टरांच्या समान अधिकार त्यांना देता येणार नाहीत, यावर आम्ही समाधान व्यक्त करत आहोत’, असं खंडपीठानं म्हटलं आहे.

उपरोक्त निरिक्षण करताना, खंडपीठानं गुजरात राज्य आणि Ors विरुद्ध डॉ. पी.ए. भट्ट मधील न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाचा संदर्भ दिला. त्यानुसार ॲलोपॅथी डॉक्टर्स आणि देशी औषधांचे डॉक्टर यांना समान वेतनाचा हक्क मिळावा म्हणून समान काम करतात असे म्हणता येणार नाही. लाइव्ह लॉ संकेतस्थळावर याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्सेस आणि आणखी एक वि. बिकर्तन दास आणि इतर यांच्या निर्णयाचा संदर्भ देखील देण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.