Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर, मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील.'; गडकरींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

'राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर, मुख्यमंत्री झाल्यावर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील.'; गडकरींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आतापर्यंत 9 दिवस पूर्ण झाले आहेत. पण महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेलं नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पण तरीही सरकार स्थापन होण्यास विलंब होताना दिसत आहे.

भाजप नेत्यांकडून येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार तयारीदेखील सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार हे आज दिल्लीच्या दिशेला रवाना झाले आहेत. ते दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खातेवाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी आहेत. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. पण त्यांना गृह खातं हवं आहे. याशिवाय एकनाथ शिंदे हे सध्या आजारी असल्यामुळे ते दिल्लीला चर्चेसाठी गेले नसल्याची माहिती आहे.

भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील, असे संकेत देण्यात येत आहेत. पण तरीदेखील अधिकृतपणे त्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. भाजपचे दोन निरीक्षक उद्या राज्यात येणार आहेत. हे निरीक्षक उद्या भाजपचा विधीमंडळ नेता आणि गटनेता ठरवणार आहे. यावेळी कोण मुख्यमंत्री होणार? याबाबतच्या सस्पेन्सवर पडदा पडणार आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
‘राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर’

“राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “नगरसेवकाला, आमदारकीची आशा, तर आमदाराला मंत्रिपदाची अपेक्षा, मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील, याची भीती”, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.

नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?
“राजकार हे अंतुष्ट आत्म्यांचं महासागर आहे. इथे सर्वच जण दु:खी आहे. नगरसेवक यासाठी दु:खी आहे की, त्याला आमदारकी मिळाली नाही. आमदार यासाठी दु:खी आहे की त्याला मंत्रिपद मिळालं नाही. जो मंत्री बनलाय तो त्याला चांगलं खातं मिळालं नाही यासाठी दु:खी आहे, त्यानंतर तो यासाठी दु:खी आहे की, त्याला मंत्रिपद मिळालं नाही. मुख्यमंत्री यासाठी टेन्शनमध्ये आहे की, हायकमांड कधी ठेवणार आणि कधी काढून टाकणार? याचा भरोसा नाही”, असं नितीन गडकरी म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.