Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समाज कल्याण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; पगार १४२४०० रुपये; अर्ज कसा करावा?

समाज कल्याण विभागात नोकरीची सुवर्णसंधी; पगार १४२४०० रुपये; अर्ज कसा करावा?
 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात सध्या भरती सुरु आहे. समाज कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात तब्बल २१९ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता इच्छुक उमेदवार १५ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करु शकतात.

समाज कल्याण आयुक्त पुणे येथे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, वॉर्डन, उच्च श्रेणी स्टेनोग्राफर, स्टेनोग्राफर टायपिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पदासाठी इच्छुक उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. त्याचसोबत MS CIT प्रमाणपत्र आणि कॉम्प्युटर विषयात कोर्स केलेला असावी.

समाज कल्याण निरीक पदासाठी पदवी आणि MS CIT चा कोर्स केलेला असावा. लघुलेखक म्हणजेच स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराने टायपिंगचा कोर्स केलेला असावा. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.sjsa.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० ते १,४२,४०० रुपये पगार मिळणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.